रोहित शर्माच्या फिटनेसबाबत समोर आली अपडेट, पहिल्या सामन्यापूर्वी काय घडलं व्हिडिओ पाहा...

मुंबई : सूर्यकुमार यादव हा मुंबई इंडियन्सच्या पहिल्या लढतीत खेळणार नाही, असे समोर येत आहे. त्याचबरोबर आता रोहित शर्माच्या फिटनेसबाबतही अपडेट समोर आले आहे. रोहित शर्माच्या फिटनेसबाबत एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

सूर्या पहिल्या सामन्यात दुखापतीमुळे खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पण त्यानंतर आता रोहितच्या फिटनेबाबत एक गोष्ट समोर आली आहे. रोहित शर्मा हा यापूर्वी झालेल्या कसोटी मालिकेत फिट होता. पण काही खेळाडूंना सराव करतानाही दुखापत झाल्याचे पाहायला मिळते. रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्ससाठी सर्वात महत्वाचा खेळाडू आहे. कारण त्याच्यासारखा दुसरा अनुभवी खेळाडू संघात नाही. रोहितच्या फिटनेसबाबतचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे. यामध्ये रोहितचा फिटनेस कसा आहे, हे समोर आले आहे.

या व्हिडिओमध्ये जसप्रीत बुमरा आणि रोहित शर्मा हे दोघेही दिसत आहे. खेळाडूंचा फिटनेस आणि रिफ्लेक्शन पाहण्यासाठी त्यांना पटापट झेल दिले जातात. यावेळी खेळाडूंचा फिटनेस कोणत्या दर्जाचा आहे, हे समजले जाऊ शकते. कारण फिटनेस चांगला नसेल तर खेळाडूंना एवढ्या पटापट झेल पकडता येत नाहीत. यावेळी बुमराहला प्रथम हा सराव करण्यासाठी बोलावले जाते. बुमरा यावेळी प्रथम हा सराव करतो. बुमरा यामध्ये फिट असल्याचे पाहायला मिळते. त्यानंतर रोहित शर्मा या सरावासाठी पुढे येतो.

रोहित शर्माला यावेळी काही झेल दिले जातात. यामध्ये एक झेल तर भन्नाट होता, जो कोणत्याही खेळाडूला सहजपणे पकडता आला नसता. कारण यावेळी चेंडू स्टम्पला लागून डीफ्लेक्ट होत असल्याचे पाहायला मिळते. हा चेंडू स्टम्पला लागून थोडा वळला असला तरी रोहित शर्माने तो झेल अचूक पकडल्याचे पाहायला मिळाले. त्यावरून रोहित शर्मा हा सुपर फिट असल्याचे यावेळी पाहायला मिळत आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या फिटनेसबाबत कुठलेही प्रश्नचिह्न नसल्याचे या व्हिडिओमुळे स्पष्ट झाले आहे.

आयपीएलचा पहिला सामना सुरु होण्यापूर्वी बरेच खेळाडू फिटनेसमुळे खेळू शकणार नसल्याचे समोर आले होते.

2024-03-24T11:09:51Z dg43tfdfdgfd