रोहितला इम्पॅक्ट प्लेअर बनवत हार्दिकने नेमकं काय दाखवून दिलं, जाणून घ्या कसा साधला डाव...

मुंबई : हार्दिक पंड्याने रोहित शर्माला वानखेडेच्या मैदानावर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून उतरवले. त्यामुळे रोहित शर्मा क्षेत्ररक्षणाला उतरला नाही, तर थेट सलामीलाच आला. पण रोहित शर्माला इम्पॅक्ट प्लेअर बनवत हार्दिकने एक मोठा डाव साधल्याचे आता समोर आले आहे.

टॉस झाल्यावर हार्दिक पंड्याने मुंबईच्या संघाची घोषणा केली. टॉस जिंकल्यावर हार्दिकने आपण प्रथम गोलंदाजी का करणार, याचे कारण सांगितले. त्यानंतर या सामन्यात कोणत्या खेळाडूला संधी दिली, हे हार्दिकने स्पष्ट केले. या सामन्यासाठी मोहम्मद नबीला संघाबाहेर करण्यात आले असून त्याच्या जागी नमन धीरला मुंबईच्या संघात स्थान देण्यात आले. त्यावेळी रोहित शर्मा हा मुंबईच्या संघातच आहे, असे सर्वांना वाटत होते. पण जेव्हा मुंबई इंडियन्सने आपला संघ सोशल मीडिावर पोस्ट केला, त्यामध्ये रोहित शर्माचा नाव हे ११ खेळाडूंच्या यादीत नव्हते. त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.

हार्दिक पंड्याकडे मुंबईचे नेतृत्व आहे, पण जेव्हा कठीण काळ येतो तेव्हा तो रोहित शर्माकडे मदत मागायला जातो, असे सर्वांनीच पाहिले होते. त्यानंतर हार्दिकला नेतृत्व करणं जमत नाही, अशी टीका काही जणांनी केली होती. त्यामुळे हार्दिक पंड्याचे मुंबईच्या चाहत्यांमधील महत्व कमी झालेले पाहायला मिळत होते. हार्दिकने केकेआरच्या सामन्यात रोहित शर्माला खेळवले, पण इम्पॅक्ट खेळाडू म्हणून. यावेळी हार्दिक पंड्याने सर्वांना दाखवून दिले की, रोहितविना मी नेतृत्व करू शकतो आणि संघाला सांभाळू शकतो. हार्दिकने त्याचबरोबर रोहितला यावेळी संघातून हळूहळू बाहेर काढण्याचा डावही यावेळी केल्याचे म्हटले जात आहे. कारण रोहित जर क्षेत्ररक्षणाला आला नाही तर एक तर त्याला टीव्हीवर दाखवणे निश्चित कमी होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंशी जास्त संपर्क राहणार नाही. त्यामुळे हार्दिक पंड्याने इम्पॅक प्लेअरचा डाव साधत रोहित शर्माला हळूहळू संघाबाहेर करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सुरु झाली आहे.

रोहित शर्माने तर हार्दिकला टी-२० वर्ल्ड कपच्या संघाचे उप कर्णधार केले होते. पण आता हार्दिकने त्याला इम्पॅक्ट खेळाडू करत त्यालाच संघाबाहेर काढायचे प्रयत्न सुरु केल्याचे चाहते म्हणत आहेत.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-04T03:57:45Z dg43tfdfdgfd