रचिन रविंद्रची बॅट तळपली, पॉवरप्लेमध्ये गोलंदाजांना फोडला घाम; फक्त ९ चेंडूत केल्या 'इतक्या' धावा

चेन्नई: आज चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएलचा सातव्या सामना खेळवला जात आहे. गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जकडून सलामीवीर रचिन रवींद्र आणि ऋतुराज गायकवाड मैदानात उतरले होते. या दरम्यान रचिन रवींद्रची खेळी उल्लेखनीय ठरली आहे. पॉवरप्लेमध्ये त्याने केलेल्या धावा संघासाठी महत्त्वाच्या ठरल्या.

प्लेऑफमध्ये रचिन रवींद्रने वादळी खेळी खेळली. २३० च्या तुफानी स्ट्राईक रेटने फलंदाजी करत त्याने २० चेंडूत ४६ धावा ठोकल्या आहेत. यात त्याने ६ चौकार आणि ३ षटकार लगावले आहेत. म्हणजेच ९ चेंडूत ४२ धावा ठोकल्या आहेत. दरम्यान डावाच्या तिसऱ्या षटकातच रचिनने उमरझाईविरुद्ध फटकेबाजी करायला सुरूवात केली. रचिनने उमरझाईच्या चेंडूवर दोन चौकार मारले. डावाच्या चौथ्या षटकात रचिनने उमेश यादवला लक्ष्य केले. त्याने पहिल्या दोन चेंडूंवर १० धावा केल्या. रचिनच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने अवघ्या ४.३ षटकांत ५० धावांचा टप्पा पार केला. मात्र याही वेळी आयपीएलमधील पहिले अर्धशतक झळकावताना रचिनच्या हाती पुन्हा निराशा मिळाली. राशिदच्या चेंडूवर तो बाद झाला.

दरम्यान पदार्पण सामन्यातही चिन रवींद्रने चांगली खेळी खेळली होती. त्याने १५ चेंडूत ३७ धावा केल्या होत्या. २४६च्या स्ट्राईक रेटने खेळत असलेल्या रचिनने आपल्या खेळीत ३ चौकार आणि ३ षटकार लगावले होते. दरम्यान रचिन रवींद्र आयपीएल लिलावात चांगली कमाई करेल अशी चर्चा होत्या. मात्र सीएसकेने रचिन रवींद्रला अवघ्या १.८० कोटींना खरेदी केले. तो आता आयपीएल २०२४मध्ये गोलंदाजांना घाम फोडत आहे. यानंतर आता तो या आयपीएलमध्ये चेन्नईसाठी महत्त्वाचा खेळाडू बनत आहे.

2024-03-26T15:59:47Z dg43tfdfdgfd