रणजी खेळूनही कोट्याधीश, स्पर्धा जिंकल्यावर बक्षीस म्हणून मिळते घसघशीत रक्कम..पाहा

रणजी ट्रॉफी 2024 चा फायनल सामना मुंबई विरुद्ध विदर्भ यांच्यात १० मार्चपासून मुंबईतील प्रथितयश वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. आतापर्यंत रणजी स्पर्धेत झालेल्या अंतिम सामन्यांमध्ये नेहमीच मुंबईचे वर्चस्व राहिले आहे. यावेळी मुंबई रणजी करंडक विजेतेपद पटकावेल, अशी अपेक्षा केली जात आहे. आजवर मुंबईने सर्वाधिक तब्बल४१ वेळा रणजी ट्रॉफी जिंकली आहे. या रणजी स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघाला किती रक्कम बक्षीस म्हणून मिळेल ते आपण जाणून घेणार आहोत.

संघावर पैशांचा पाऊसबीसीसीआयने गेल्या वर्षी रणजी ट्रॉफीतील बक्षिसाच्या सक्मेत वाढ केली होती.यापूर्वी मागील वर्षापर्यंत रणजी ट्रॉफी विजेत्या संघाला २ कोटी रुपये तर उपविजेत्या संघाला १ कोटी बक्षीस म्हणून देण्यात आले. मात्रआता यात बदल झाला आहे.बीसीसीआयने वाढवलेल्या बक्षीस रकमेनुसार यंदा रणजी करंडक जिंकणाऱ्या संघाला ५ कोटी रुपये मिळतील. उपविजेत्या संघालाही तीन कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

विजेत्याकडे लागले लक्षरणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात विदर्भाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा स्थितीत मुंबईचा संघ पहिल्या डावात 224 धावा करून ऑलआऊट झाला. त्याला प्रत्युत्तर देताना विदर्भाची फलंदाजीही पूर्णपणे फ्लॉप ठरली.विदर्भाचा संपूर्ण संघ केवळ 105 धावा करून ऑलआऊट झाला. यानंतर दुसऱ्या डावात मुंबईने अप्रतिम फलंदाजी केली.

मुशीर खानने ठोक शतकमुंबई संघाच्या फलंदाजीने या सामन्यात चांगलाच जोर पकडला आहे. मुशीर खानने शतकी खेळी केली (१३६), श्रेयस अय्यर (९५) आणि अजिंक्य रहाणेच्या (७३) अर्धशतकांच्या जोरावर मुंबईने दुसऱ्या डावात ४१८ धावा केल्या आणि विदर्भासमोर ५३८ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. चौथ्या दिवसाचा खेळ पूर्ण होईपर्यंत विदर्भाने ५ विकेट्सच्या मोबदल्यात २४८ धावा केल्या आहेत. आता सामन्याच्या पाचव्या दिवशी त्यांना विजयासाठी २९० धावांची गरज आहे.

2024-03-14T06:59:26Z dg43tfdfdgfd