लोकेश राहुलला IPL 2024 खेळण्यासाठी बीसीसीआयचा वेगळाच नियम, पाहा काय करावं लागणार

नवी दिल्ली : लोकेश राहुल दुखापतीमुळे पाचव्या कसोटी सामन्यात खेळणार नाही, पण तो आता आयपीएलमध्ये खेळण्यासाठी सज्ज होत आहे. पण राहुललाल जर आता आयपीएलमध्ये खेळायचे असेल तर त्यासाठी आता वेगळाच नियम बीसीसीआयने सांगितला आहे.

लोकेश राहुल सध्या आहे तरी कुठे, जाणून घ्या....

राहुलला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दुखापत झाली होती. त्यानंतर तो एकही कसोटी सामना खेळला नाही. लोकेश राहुलवर त्यानंतर वैद्यकीय उपचार करण्यात आले. त्यानंतर राहुल पुन्हा एकदा उपचारांसाठी लंडनला गेला होता. लंडनमध्ये उपचार घेतल्यावर राहुल हा भारतामध्ये दाखल झाला आहे.

लोकेश राहुल सध्या कुठे आहे....

राहुल सध्याच्या घडीला बीसीसीआयच्या बंगळुरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आहे. या अकादमीमध्ये त्याच्या दुखापतींचे पुनर्वसन केले जाईल आणि तो खेळण्यासाठी फिट आहे की नाही, हे पाहिले जाईल. त्यामुळे आता राहुलला दुखापतीमधून सावरल्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये घाम गाळावा लागणार आहे.

राहुलला IPL खेळण्यासाठी काय करावे लागणार...

राहुल आता तर कसोटी मालिकेत खेळू शकणार नाही. त्यानंतर आयपीएल खेळवली जाणार आहे. राहुलला जर आता आयपीएल खेळायची असे ल तर त्याला सर्वप्रथम आपला फिटनेस सिद्ध करावा लागेल. पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे राहुलला आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडून 'रीटर्न टु प्ले' हे सर्टिफिकेट मिळवावं लागणार आहे. जोपर्यंत राहुलला हे सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत त्याला आयपीएल खेळता येणार नाही. त्यामुळे हे सर्टिफिकेट राहुलसाठी सर्वात महत्वाचे असेल, जर राहुलला ते मिळालं नाही तोपर्यंत त्याला आयपीएल खेळता येणार नाही. त्यामुळे ही गोष्ट राहुलला कधी मिळते, त्यावर तो कधी मैानात उतरणार हे स्पष्ट होऊ शकते.

राहुलसाठी का वेगळा नियम का वाटतं आहे...

ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना संघात स्थान मिळवण्यासाठी बीसीसीआयने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा खेळायला सांगितली होती, पण राहुलला मात्र तसे सांगण्यात आलेले नाही.

राहुल हा आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार आहे. त्यामुळे तो कधी फिट होतो याकडे लखनौच्या संघाचे लक्ष लागलेले असेल.

2024-03-04T12:03:09Z dg43tfdfdgfd