लक्षात ठेवा तेव्हा रोहित शर्माच होता जो हार्दिकच्या मागे उभा राहिला; IPLच्या तोंडावर माजी क्रिकेटपटूचे मोठे वक्तव्य

मुंबई: आयपीएल २०२४ला सुरुवात होण्यास फक्त २ दिवस शिल्लक आहेत. स्पर्धेतील पहिली लढत चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात होणार आहे. या वर्षी स्पर्धा सुरू होण्याच्या आधीपासून सर्वाधिक चर्चा आहे ती पाच वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्सची होय. आयपीएल २०२४च्या लिलावाआधीच गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या मुंबई संघात परत आला. तर लिलाव झाल्यानंतर मुंबईने रोहित शर्माच्या जागी हार्दिकची कर्णधार म्हणून नियुक्ती केली.

आता आयपीएलच्या आधी सर्व संघांनी सराव सुरू केला असताना माजी क्रिकेटपटू पार्थिव पटेलने मंगळवारी हार्दिक पंड्याबाबत एक मोठे वक्तव्य केले. आयपीएलमध्ये जेव्हा हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह खराब फॉर्ममध्ये होते तेव्हा रोहित शर्मा त्यांच्या पाठीशी उभा राहिला होता. इतक नाही तर पार्थिवने रोहितची तुलना चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीशी केली. रोहितने इतक्या मोठ्या करिअरमध्ये कधीच चूक केली नाही. तर चेन्नईचा कर्णधार धोनीकडून अनेक चूका झाल्याचे तो म्हणाला.

रोहितची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, त्याने नेहमीच संघातील खेळाडूंना पाठिंबा दिला आणि त्यांच्यासोबत उभा राहिला. याचे सर्वात चांगले उदाहरण म्हणजे हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह होय. बुमराह २०१४ साली मुंबई इंडियन्स संघात आला आणि २०१५ पर्यंत त्याची कामगिरी फार चांगली नव्हती. त्याला अर्ध्या सत्रानंतर माघारी पाठवण्याचा विचार सुरू होता. पण रोहितला त्याच्या क्षमतांवर विश्वास होता आणि २०२६ नंतर बुमराहने शानदार कामगिरी करून दाखवल्याचे पार्थिवने सांगितले.

फक्त हार्दिक नाही तर हार्दिक पंड्यासोबत देखील असेच झाले होते. २०१५ आणि २०१६ मध्ये त्याची कामगिरी चांगली झाली नाही. पण मुंबई इंडियन्सने त्याच्यावर विश्वास दाखवला. पार्थिवने यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाचे देखील कौतुक केले. सामन्यात जेव्हा तणावपूर्ण परिस्थिती असते तेव्हा काही निर्णय चुकीचे घेतले जाऊ शकतात. पण रोहितने गेल्या १० वर्षाच अशी चूक केली नाही. अशा क्षणी धोनीने देखील चूका केल्याचे दिसेत, मात्र रोहित नेहमी शांत राहतो, असे पार्थिव म्हणाला.

2024-03-19T15:28:28Z dg43tfdfdgfd