लखनौ सुपर जायंट्सचा सलग तिसरा विजय, ३३ धावांनी गुजरात टायटन्सला नमवलं

केएल राहुल फलंदाजीमध्ये काही खास कामगिरी करण्यात अपयशी ठरला असेल, परंतु त्याच्या नेतृत्वाखाली लखनऊ सुपर जायंट्स आयपीएल 2024 हंगामात जोरदार कामगिरी करत आहे. पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर या संघाने आपल्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर दमदार पुनरागमन करत आता विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. मोसमातील चौथ्या सामन्यात लखनौने घरच्या मैदानावर गुजरात टायटन्सचा ३३ धावांनी पराभव केला. लखनौने केवळ १६३ धावा करून हा विजय नोंदवला आणि याचे कारण यश ठाकूर आणि कृणाल पंड्या यांनी मिळून ८ विकेट घेत गुजरातचा पराभव केला.

लखनौने प्रथम फलंदाजी करताना १६३ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातचा संघ केवळ १३० धावा करू शकला. लखनौकडून यश ठाकूरने शानदार गोलंदाजी करत ५ बळी घेतले. लखनौसाठी मार्कस स्टॉइनिसने शानदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. त्याने ५८ धावा केल्या. निकोलस पुरनने नाबाद ३२ धावा केल्या. आयुषने २० धावांचे योगदान दिले. गुजरातकडून गोलंदाजी करताना दर्शन आणि उमेश यादवने २-२ बळी घेतले.

गुजरातकडून राहुल तेवतियाने ३० धावा केल्या. साई सुदर्शनने ३१ धावा केल्या. विजय शंकरने १७ धावांची खेळी केली. यादरम्यान लखनौकडून यशने गोलंदाजी करताना ५ बळी घेतले. कृणाल पांड्याने ३ बळी घेतले. रवी बिश्नोई आणि नवीन यांना १-१ विकेट मिळाली.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-07T18:32:44Z dg43tfdfdgfd