लखनौ सुपरजायंट्सचा सलग दुसरा पराभव, आठ गडी राखून कोलकाता नाइट रायडर्सचा विजय

कोलकाता: सलामीवीर फिल सॉल्टच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने लखनौ सुपरजायंट्सचा आठ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना लखनौने २० षटकांत सात गडी गमावून १६१ धावा केल्या, परंतु सॉल्टच्या १४ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद ८९ धावांच्या जोरावर केकेआरने १५.४ षटकांत दोन बाद १६२ धावा केल्या. केकेआरसाठी कर्णधार श्रेयस अय्यरने ३८ चेंडूत नाबाद ३८ धावा केल्या. यादरम्यान लखनौकडून मोहसीन खानने गोलंदाजी करताना २ बळी घेतले.

प्रथम फलंदाजी करताना लखनौने २० षटकांत ७ गडी गमावून १६१ धावा केल्या. निकोलस पुरनने ३२ चेंडूत ४५ धावा केल्या. केएल राहुलने ३९ धावांची खेळी केली. डी कॉक १० धावा करून बाद झाला. यादरम्यान कोलकाताकडून गोलंदाजी करताना मिचेल स्टार्कने ३ बळी घेतले.

कोलकाता संघाला गेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून (सीएसके) पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र घरच्या मैदानावर विजय मिळवत संघाने पुनरागमन केले. कोलकाताने आतापर्यंत पाच सामन्यांत केवळ एकच सामना गमावला आहे, तर चार सामने जिंकले आहेत. KKR आठ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर KL राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे आणि सहा सामन्यांत तीन विजय आणि तीन पराभवांसह सहा गुणांसह ते पाचव्या स्थानावर आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-14T13:55:26Z dg43tfdfdgfd