लवकरच काऊंटी क्रिकेटमध्ये खेळतांना दिसेल हा भारतीय गोलंदाज, भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये अजमावले नशीब

भारतीय संघाचा डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट यंदाच्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये इंग्लंडच्या क्लब ससेक्सकडून पाच सामने खेळणार आहे. ३२ वर्षीय जयदेव उनाडकटने भारतासाठी ४ कसोटी सामने खेळले आहेत. मागील हंगामात काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये ससेक्ससाठी चार सामन्यांत ११ बळी घेतले होते.

भारतासाठी शेवटचा सामनागेल्या वर्षी वेस्ट इंडिज विरुद्ध उनाडकट आपला शेवटचा सामना खेळला. उनाडकटच्या नेतृत्वाखाली सौराष्ट्रने २०१९-२० मध्ये रणजी करंडक जिंकला होता. काऊंटी क्रिकेटमध्ये, उनाडकटने लीसेस्टरशायरविरुद्ध दुसऱ्या डावात ६ विकेट घेत आपल्या संघाला १५ धावांनी विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. यावेळी देखील अशी कामगिरी तो करेल असा अनेकांना विश्वास आहे.

काऊंटीने दिले आपलेपणउनाडकट काऊंटी क्रिकेटमध्येमध्ये चांगली कामगिरी करतांना दिसला, गेल्या हंगामात त्याच्या संघाने होव्ह येथे लिसेस्टरशायर संघाविरुद्ध विजय मिळवला यावेळी काऊंटी क्रिकेटमध्ये त्याला आपलेपणा जाणवला.काउंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळण्यापूर्वी उनाडकट इंडियन प्रीमियर लीगमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळणार आहे.

जयदेव उनाडकटची आयपीएल कारकीर्दजयदेवने आयपीएलमध्ये देखील चमकदार कामगिरी केली आहे. २०१० मध्ये त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून, उनाडकटने एकूण ९४ सामने खेळले आहेत, ज्यात त्याने ८.८५ च्या इकॉनॉमीने गोलंदाजी करताना ९१ बळी घेतले आहेत. आयपीएलमध्ये, उनाडकट राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, दिल्ली कॅपिटल्स, रायझिंग पुणे सुपरजायंट्स आणि लखनऊ सुपरजायंट्सकडून खेळला आहे. आता तो यावर्षी केशरी जर्सीमध्ये एसआरएचकडून खेळताना दिसणार आहे.

2024-03-19T10:27:51Z dg43tfdfdgfd