विराट कोहली सामना सुरु असताना पंचावर का भडकला, जाणून घ्या खरं कारण...

मुंबई : विराट कोहली हा मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांच्यातील सामना सुरु असताना पंचांवर भडकला होता. पण सामना सुरु असताना असं नेमकं घडलं तरी काय होतं, हे आता समोर आले आहे.

ही गोष्ट घडली ती २० व्या षटकात. आरसीबीचा संघ यावेळी धडाकेबाज फटकेबाजी करत होता. कारण दिनेश कार्तिक हा तुफानी फटकेबाजी करत धावांची लयलूट करत होता. विराट कोहली त्यावेळी मैदानात खेळत नव्हता. पण यावेळी दिनेश कार्तिकबरोबर एक गोष्ट घडली तेव्हा कोहली हा मैदानात येऊन पंचांवर भडकल्याचे पाहायला मिळाले. कोहलीचा पारा यावेळी चांगलाच चढला होता. पण कोहलीला भडकायला एवढं झालं तरी काय होतं, हे आता समोर आले आहे.

मुंबई इंडियन्सचा आकाश मढवाल हे २० वे षटक टाकत होता. या षटकाच्या पहिल्या चेंडूवर आकाश दीपने एक धाव काढली आणि दिनेश कार्तिक स्ट्राइकला आला. कार्तिकने यापूर्वीच्या आकाशच्या षटकात चार चौकार वसूल केले होते. त्यामुळे कार्तिक आता काय करतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. यावेळी आकाशने एक फुलटॉस चेंडू टाकला. हा चेंडू कदाचित आकाशच्या हातून सुटल्याचे वाटत होते. हा चेंडू थेट कार्तिकच्या बॅटवर आला, पण त्याची उंची मात्र जास्त दिसत होता. फुलटॉस चेंडू हा कंबरेच्या वरती आला असेल तर त्याला नो बॉल ़दिले जाते, असा क्रिकेटचा नियम आहे. त्यामुळे हा चेंडू नो बॉल आहे का, अशी विचारणा कार्तिक पंचांकडे करत होता. त्यावेळी पंचांनी हा नो बॉल नसल्याचे सांगितले. त्यामुळे मोक्याच्या क्षणी एक चेंडू आरसीबीसाठी वाया गेला. त्यावेळी कोहली हा पंचांवर चांगलाच भडकल्याचे पाहायला मिळाले होते.

कोहली हा त्यावेळी पंचांकडे धावत आला. यावेळी कार्तिकने खेळलेला चेंडू हा नो बॉल का नाही, अशी विचारणा कोहलीने सीमारेषेजवळ असलेल्या पंचांना केली. त्यावेळी हा चेंडू रिप्लेमध्येही नो बॉल वाटत नसल्याचे कोहलीला सांगण्यात आले. त्यावेळी कोहली चांगलाच भडकल्याचे दिसत होते. कारण हा चेंडू नो बॉल असल्याचे कोहली आणि कार्तिकसह बऱ्याच चाहत्यांना वाटत होते. त्यामुळे कोहली यावेळी चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला. कार्तिकनेही यावेळी आपली नाराजी व्यक्त केली. पण त्याचा काहीही परीणाम झाला नाही.

मुंबई इंडियन्सने या सामन्यात वादळी फटकेबाजी केली आणि हा सामना सहजपणे जिंकल्याचे पाहायला मिळाले.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-12T12:12:52Z dg43tfdfdgfd