विराटला माझं नाव माहिती होतं, श्रेयाकाचा आनंद गगनात मावेना, ट्विट करून भेटीचा किस्सा सांगितला

नवी दिल्ली : क्रिकेट विश्वात सध्या एका नव्या महिला खेळाडूचे नाव खूप चर्चेत आले आहे. श्रेयांका पाटील असं तिचं नाव आहे. सोशल मीडियावर ती सध्या ट्रेंडिगवर आहे. नुकत्याच पार पडलेल्या महिला प्रिमियर लीगमध्ये भरीव कामगिरी केल्यामुळे ती चर्चेत आली आहे. यंदाच्या म्हणजे २०२४च्या महिला प्रिमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू या टीमला विजय मिळवून देत तिने मोलाची भूमिका बजावली आहे. श्रेयांकाने विराटसोबत फोटो असलेलं एक ट्वीट (एक्स) केलंय. त्यात ती म्हणाली आहे की, ''विराट कोहलीचं क्रिकेट मी नेहमी बघत असायची. त्याचं क्रिकेट पाहून मी मोठी झाली आहे.'' असं श्रेयांका म्हणाली आहे.

काल रात्री माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण होता. विराट मला म्हणाला की, ''हाय श्रेयांका, तुझी गोलंदाजी चांगली होती. त्याला खरं तर माझं नाव माहिती होतं''असं श्रेयांकाने ट्वीट (एक्स) करत आपला आनंद व्यक्त केला आहे.

श्रेयांका पाटील ही मूळची कर्नाटकमधील आहे. रविवारी महिला प्रीमियर लीग २०२४च्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सलला ११३ धावांवर गुंडाळत मोठी कामगिरी केल्यानं तिला इमर्जिंग प्लेअर ऑफ द टूर्नामेंट जिंकला. तिची ही खेळी पाहून चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. त्याचबरोबर अंतिम फेरीत चार विकेट्स घेत तिने आरसीबीला मिळवून दिलेले विजयाचे क्षण अनेकांनी आपल्या डोळ्यात टिपले आहेत.

श्रेयांका पाटील हीचा जन्म ३१जुलै २००२ रोजी बंगळुरू, कर्नाटक येथे झाला आहे. श्रेयांका पाटील विराट कोहलीला आपला आदर्श मानते. वयाच्या ९व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. श्रेयांका पाटील ही उत्कृष्ट ऑफ स्पिन गोलंदाज आहे. श्रेयांका पाटीलने भारतासाठी २ एकदिवसीय सामन्यात ४ बळी आणि ६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ८ बळी घेतले आहेत.

2024-03-20T12:30:40Z dg43tfdfdgfd