सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सच्या संघात कधी दाखल होणार, आयपीएल खेळण्याबाबत मोठी अपडेट

मुंबई : सूर्यकुमार यादव फिट झाल्याचे बुधवारी सर्वांसमोर आले खरे, पण तो अजूनही बंगळुरु येथे राष्ट्रीय क्रिकेट अकादमी येथे आहे. पण सूर्या मुंबई इंडियन्सच्या संघात कधी दाखल होणार, याची माहिती आता समोर आली आहे. पण सूर्या आयपीएलचा सामान लगेच खेळू शकतो का, याबाबत मात्र अजूनही स्पष्टता आलेली नाही.

सूर्या हा दक्षिण आफ्रिेकेच्या दौऱ्यावर असताना जायबंदी झाला होता. त्यानंतर गेले तीन महिने सूर्या हा क्रिकेटपासून लांब होता. सूर्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली होती. त्यानंतर सूर्या हा राष्ट्रीय क्रिकेट अकादमी येथे रवाना झाला होता. तिथे त्याला फिटनेस कमावण्यासाठी बराच वेळ लागत होता. आयपीएलला सुरुवात होण्यापूर्वी सूर्याची पहिली फिटनेस टेस्ट झाली होती. यावेळी सूर्या या फिटनेस टेस्टमध्ये नापास झाला होता. त्यामुळे सूर्या आयपीएलच्या पहिल्या सामन्यात खेळणार नाही, हे स्पष्ट झाले होते. त्यानंतर आयपीएल सुरु झाल्यावर पुन्हा एकदा सूर्याची फिटनेस टेस्ट घेण्यात आली होती. या दुसऱ्या फिटनेस टेस्टमध्येही सूर्या नापास ठरला होता. त्यामुळे सूर्या आयपीएल खेळणार की नाही, अशी चर्चा सुरु होती. पण सूर्या आता तिसऱ्या फिटनेस चाचणीत पास झाला आहे. त्यामुळे आता आयपीएलमध्ये खेळू शकतो. पण तो मुंबई इंडियन्सच्या संघात कधी दाखल होणार, हे आता समोर आले आहे.

मुंबई इंडियन्सचा पुढील सामना हा ७ एप्रिलला खेळवण्यता येणार आहे. हा सामना दिल्ली कॅपिटल्सबरोबर होणार आहे. हा सामना खेळण्यासाठी अजून तीन दिवसांचा तर अवधी नक्कीच आहे. त्यामुळे सूर्या आता या सामन्यासाठीच्या सरावात सहभागी होऊ शकतो. त्यामुळे येत्या काही दिवसांत सूर्या हा मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये दिसणार आहे. पण सूर्या आता दिल्ली कॅपिटल्सचा सामान खेळू शकणार की नाही, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे यासाठी अजून काही वेळ वाट पाहावी लागणार आहे.

मुंबई इंडियन्सच्या संघाने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. या तिन्ही सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे आता सूर्या संघात आल्यावर मुंबई इंडियन्सची कामगिरी कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-05T10:42:59Z dg43tfdfdgfd