सूर्यकुमार यादवकडून पहिल्याच सामन्यात झाली मोठी चूक, पाहा नेमकं घडलं तरी काय...

मुंबई : सूर्यकुमार यादवचा हा या आयपीएलमधील हा पहिलाच सामना होता. त्यामुळे सूर्या या सामन्यात कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. पण सूर्याकडून यावेळी एक मोठी चूक घडल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे संघाला मोठा फटका बसल्याचेही समोर आले.

सूर्या फिट झाल्यावर त्याला लगेच मुंबई इंडियन्सच्या संघाने खेळण्याची संधी दिली होती. त्यामुळे सूर्या या सामन्यात किती धावा करतो, याके सर्वांचे लक्ष लागलेले होते. रोहित शर्मा बाद झाला आणि सूर्या मैदानात आला. सूर्या मैदानात आल्यावर त्याच्या नावाचा वानखेडे स्टेडियमवर जयघोष सुरु झाला. कारण सूर्याचा हा पहिलाच सामना होता आणि चाहते त्याची फटकेबाजी पाहण्यासाठी उत्सुक होते. पण मैदानात आल्यावर सूर्याकडून एक मोठी चूक घडली आणि त्यामुळेच चाहते निराश झाले.

सूर्या मैदानात आल्यावर पहिला चेंडू खेळला तेव्हा दिल्लीच्या संघाने पायचीतची अपील केली होती. पण सूर्या यामधून वाचला. कारण पंचांनी त्याला बाद दिले नाही. सूर्याबरोबर त्याच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी होती. त्यानंतर सूर्या आता काय करणार, याकडे सर्वांचे लक्ष होते. दुसऱ्या चेंडूवर सूर्याने मोठा फटका मारला. पण सूर्याला यावेळी चांगला फटका मारता आला नाही. कारण यावेळी सूर्याचे टायमिंग चुकले आणि त्यामुळेच त्याला झेल उडाला. हा झेल दिल्लीच्या खेळाडूने टिपला आणि भोपळाही न फोडता सूर्या बाद झाला. यावेळी सूर्याकडून मोठी चुक घडली. कारण सेट न होता पहिल्याच चेंडूवर सूर्याने मोठा फटका मारण्याची घाई केली आणि तिथेच तो फसला. सूर्या आपला पहिलाच सामना खेळत होता. त्यामुळे त्याने थोडा वेल सेट व्हायला घेतला असता त्याच्याकडून मोठी खेळी पाहायला मिळाली असती, पण तसे घडले नाही. पहिल्याच चेंडूवर सूर्यासाठी अपील झाली होती. त्यानंतर दुसराच चेंडू तो मारायला गेला. त्यामुळे पुढच्या सामन्यात सूर्या ही चूक सुधारणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

सूर्याकडून पहिल्या सामन्यात मोठी चूक घडली खरी, पण तो आता दुसऱ्या सामन्यात कशी फलंदाजी करतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-07T12:27:13Z dg43tfdfdgfd