'हो मीच तो...' हनुमा विहारीने आरोप केलेला क्रिकेटपटू आला समोर, म्हणाला...

Hanuma Vihari Vs Prudhvi Raj: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज हनुमा विहारीने (Hanuma Vihari) केलेल्या एका पोस्टने भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ उडवून दिली आहे. हनुमाने आंध्रप्रदेश असोसिएशनविरोधात (Andhra Cricket Association) बंड करत एक मोठं वक्तव्य केलं. एका खेळाडूला ओरडल्याने आपण राजकारणाचा बळी ठरल्याचा आरोप हनुमा विहारीने केला आहे. हनुमा विहारीने कोणत्या खेळाडूचं नाव घेतलं नव्हतं. पण ज्या खेळाडूविरोधात हनुमाने आरोप केले होते, तो खेळाडू आता समोर आला आहे. आंध्रप्रदेश संघाचा विकेटकीपर-फलंदाज केएन पृध्वी राज (Prudhavi Raj) याने सोशल मीडियातून आरोप फेटाळून लावले आहेत. 

'हा मीच तो खेळाडू...'  

केएन पृध्वीने इस्टाग्राम अकाऊंटवर आपलं म्हणणं मांडलं आहे. यात त्याने म्हटलंय ' सर्वांना नमस्कार... मीच तो व्यक्ती आहे ज्याला तुम्ही कमेंट बॉक्समध्यो शोधत आहात. पण तुम्ही जे ऐकलं आहे ते संपूर्णपणे खोटं आहे. खेळापेक्षाही काहीही मोठं नाही आणि माझा स्वाभिमान कोणत्याही गोष्टीपेक्षा मोठा आहे. व्यक्तीगत टीका आणि अशोभनीय भाषा खपवून घेतली जाणार नाही. संघातील प्रत्येकाला माहिती आहे त्या दिवशी नेमकं काय झालं. केवळ सहानभूती मिळवण्याचा प्रकार सुरु आहे.'

केएन पृध्वीचे वडिल हे आंध्रप्रदेशमधील जनसेना पार्टीशी संबंधीत आहेत. 

हनुमाने काय केले होते आरोप?

क्रिकेट हनुमा विहारीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. यात त्याने काही आरोप केले होते. 'या पोस्टच्या माध्यमातून काही सत्य गोष्टी मी तुमच्या समोर आणू इच्छितो. बंगालविरुद्धच्या पहिल्या सामन्यात मी कर्णधार होतो. सामन्यादरम्यान एका खेळाडूला मी ओरडलो. त्या खेळाडूने आपल्या राजकारणात असलेल्या वडिलांकडे याची तक्रार केली. त्याच्या वडिलांनी माझ्याविरुद्ध कारवाई असोसिएशनला कारवाई करण्यास सांगितलं.'

'खेळाडू म्हणून वैयक्तिक कधीच कोणाबद्दल टीका केली नाही,  मी गेल्या सात वर्षात पाच वेळा आंध्रप्रदेशला नॉकआऊटमध्ये जागा मिळवून दिली. भारतासाठी 16 आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळलो. पण असोसिएशसाठी तो खेळाडू माझ्यापेक्षा महत्त्वाचा होता'

आंध्र प्रदेशचं कर्णधारपद सोडलं

हनुमा विहारने खासगी कारणामुळे आंध्रप्रदेशचं कर्णधारपद सोडलं. पण आता आपण आंध्रप्रदेशसाठीही कधी खेळणार नसल्याचं हनुमा विहारीने म्हटलं आहे. आंध्रप्रदेशसाठी आपण झोकून खेळलो. गेल्या वर्षी रणजी ट्रॉफी स्पर्धेत उजव्या हाताला दुखापत झाल्यानंतर डाव्या हाताने फलंदाजी केली. ज्या पद्धतीने संघ प्रगती करतोय ते कौतुकास्पद आहे. पण असोसिएशनाल संघाची प्रगती बघवत नाहीए, त्यामुळे यापुढे आंध्रप्रदेशकडून न खेळण्यााच निर्णय घेतल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे. 

2024-02-27T14:30:43Z dg43tfdfdgfd