हार्दिक एकटा पडलाय? सामन्यानंतरचा हा VIDEO पाहाच; MI चा माजी खेळाडू थेट डगआऊटमध्ये पोहोचला अन्..

IPL 2024 This Player Consoles Hardik Pandya in Dugout: आयपीएलच्या यंदाच्या पर्वामध्ये मुंबई इंडियन्सच्या संघामध्ये हार्दिक पंड्या गट विरुद्ध रोहित शर्मा गट अशी दुफळी निर्माण झाली आहे की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. असं असतानाच आता मुंबई इंडियन्सकडून खेळलेला माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने मुंबईच्या खेळाडूंवरच याचं खापर फोडलं आहे. मुंबईचे खेळाडू हार्दिकला कर्णधार म्हणून स्वीकारण्यास तयार नसल्याच्या मुद्द्यावरुन हरभजन सिंगने कठोर शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली आहे. 2024 च्या पर्वाआधी हार्दिकला मुंबईच्या संघात पुन्हा स्थान देण्यात आलं आणि नंतर कर्णधारपदही रोहित शर्माकडून काढून हार्दिककडे सोपवण्यात आलं. मात्र हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या संघाला आपल्या पहिल्या तिन्ही सामन्यांमध्ये पराभवाचं तोंड पहावं लागलं आहे.

हार्दिक एकटा हे फारसं चांगलं चित्र नाही

रविवारी झालेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यातही मुंबईचा पराभव झाल्यानंतर हार्दिक मुंबईच्या डगआऊटमध्ये एकटाच बसून असल्याचं कॅमेरात टीपलं गेलं. हे दृश्य पाहून हरभजन संतापला असून त्याने हार्दिकला एकटं पाडण्यात आलं असून संघातील परिस्थिती फारशी चांगली दिसत नाही. तसेच त्याला कर्णधार करण्याचा निर्णयही सकारात्मक ठरल्यासारखं वाटत नाही, असंही हरभजनने म्हटलं आहे. हार्दिक पंड्या एकटाच डगआऊटमध्ये बसून असल्याचं चित्र फारस समाधानकारक नसल्याचं मत हरभजनने व्यक्त केलं. 

रोहित एकटाच निघून गेला

रोहित शर्मा राजस्थानविरुद्धच्या सामन्यात पराभव झाल्यानंतर एकटाच वानखडेच्या मैदानातून ड्रेसिंग रुममध्ये निघून गेल्याचं क्रिककार्ड या युट्यूब चॅनेलने शेअर केलेल्या व्हिडीओत दिसत आहे. त्यानंतर हार्दिक एकटाच डगआऊटमध्ये जाऊन बसल्याचं पाहायला मिळालं. मात्र याच डगआऊटमधील एक नवा व्हिडीओ समोर आला असून त्यामध्ये एक माजी क्रिकेटपटू हार्दिकला प्रोत्साहन देताना दिसत आहे. 

हार्दिकला या खेळाडूने दिलं प्रोत्साहन

हार्दिकला प्रोत्साहन देणाऱ्या या क्रिकेटपटूचं नाव आहे अंबती रायडू. खरं तर हरभजनने ज्या कार्यक्रमामध्ये नाराजी व्यक्त केली त्यामध्ये रायडूही सहभागी झाला होता. मात्र त्यापूर्वीच रायडूने मैदानात डगआऊटमध्ये जाऊन हार्दिकला धीर दिला. रायडू हार्दिकला काहीतरी समजावून सांगत होता. त्यानंतर त्याने हार्दिकच्या खांद्यावर हात ठेवला आणि हसला. तसेच डगाऊटमधून निघण्यापूर्वी त्याने हार्दिकशी हॅण्डशेक करुन पुन्हा त्याच्या पाठीवर शब्बासकी देतात त्याप्रमाणे हात ठेवत धीर दिला. "आपण का पडतो? असं झालं तरच आपण स्वत:ला सावरु शकतो," अशा कॅप्शनसहीत हा व्हिडीओ मुंबई इंडियन्सच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. रायडू आणि हार्दिकचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुद्दाम हार्दिकला गोंधळलेला दाखवण्याचा प्रयत्न?

दरम्यान दुसरीकडे चर्चासत्रामध्ये त्यानंतर रायडूने, मुंबईच्या संघातील खेळाडू जाणूनबुजून हार्दिक गोंधळलेला आहे असं दाखवण्याचा तसेच तो मुक्तपणे वावरत नसल्याचं दाखवत आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर हरभजनने, "हे जाणीवपूर्वक केलं जात आहे की अजाणतेपणे होत आहे मला ठाऊक नाही. मात्र संघात असे अनेकजण आहेत जे हार्दिकला गोंधळात टाकत आहेत. ड्रेसिंग रुममधील मोठ्या व्यक्ती त्याला मुक्तपणे काम करु देत नसल्यासारखं वाटतं आहे. सकोणत्याही कर्णधाराही ही अशी परिस्थिती फारशी चांगली नसते," असं हरभजन म्हणाला.

2024-04-03T06:25:33Z dg43tfdfdgfd