हार्दिक नाही तर मुंबईने करोडो खर्च केलेला खेळाडू झाला मुंबईसाठी व्हिलन, पाहा कोण आहे तो..

मुंबई : हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सच्या तिसऱ्या पराभवाचे व्हिलन समजले जात होते. पण हार्दिक नाही तर मुंबई इंडियन्सच्या संघाने ज्याच्यावर करोडो रुपये खर्च केले तोच संघासाठी व्हिलन ठरल्याचे पाहायला मिळाले.

मुंबई इंडियन्सचा वानखेडे स्टेडियमवर सोमवारी लाजीरवाणा पराभव झाला. मुंबई इंडियन्सची सुरुवातच एवढी वाईट झाली की, त्यामधून बाहेर पडताच त्यांना आले नाही आणि त्यांना सामना गमवावा लागला. हा सामना मुंबईला हार्दिक पंड्यामुळे गमवावा लागला, असे म्हटले जात होते. पण हार्दिक नाही तर मुंबई इंडियन्समे करोडो रुपये खर्च केलेला खेळाडू मुंबईसाठी खलनायक ठरल्याचे पाहायला मिळाले.

हार्दिक पंड्याकडून कोणती चूक झाली होती...

मुंबई इंडियन्सचा डाव अडचणीत सापडला असताना हार्दिक पंड्या फलंदाजीला आला. हार्दिकला तिलक वर्मा चांगली साथ देत होता. त्यामुळे हार्दिक आणि तिलक वर्मा मोठी खेळी साकारतील, असे वाटत होते. या जोडीने ५६ धावांची भागीदारी देखील रचली होती. पण त्याचवेळी हार्दिक पंड्या मोठा फटका मारण्यासाठी गेला आणि बाद झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे हार्दिकला यावेळी दोषी ठरवले जात होते. पण हा़र्दिक हा मुंबईच्या पराभवाचा व्हिलन ठरला नसल्याचे समोर आले आहे.

मुंबईच्या पराभवाचा कोण ठरला खलनायक...

मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएलपूर्वी अमिराती आणि न्यूयॉर्क येथील लीग खेळून आला होता. अमिराती आणि न्यूयॉर्क या दोन्ही संघात होता तो ट्रेंट बोल्ट. बोल्टला संघात घेण्यासाठी मुंबई इंडियन्सने करोडो रुपये खर्च केले होते. पण बोल्ट हा मुंबई इंडियन्ससाठी फक्त अमिराती आणि न्यूयॉर्क या संघापुरता मर्यादीत राहीला. पण आयपीएलमध्ये मात्र तो राजस्थान रॉयल्सच्या संघात होता आणि त्याने मुंबई इंडियन्सच्या डावाला खिंडार पाडल्याचे पाहायला मिळाले. यापूर्वी बोल्ट आयपीएलमध्ये मुंबईच्या संघातही होता. पण त्याला मुंबईने संघात कायम ठेवले नाही आणि तो राजस्थानच्या संघात गेला. हाच बोल्ट मुंबईच्या पराभवाचे मुख्य कारण ठरल्याचे समोर आले आहे.

बोल्टने या सामन्यात रोहित शर्मा, नमन धीर आणि डेव्हाल्ड ब्रेव्हिस यांना बाद केले. बोल्टने यावेळी ४ षटकांत २२ धावा देत तीन विकेट्स मिळवले आणि राजस्थानच्या विजयाचा तो नायक ठरला. पण दोन महिन्यांपूर्वीच तो मुंबईच्या संघाकडून खेळला होता. त्यामुळे मुंबईने ज्याच्यावर दोन महिन्यांपूर्वी करोडो रुपये खर्च केले होते, तोच त्यांच्या पराभवाचे मुख्य कारण ठरला आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-02T11:15:40Z dg43tfdfdgfd