हार्दिक पंड्या गुजरातच्या कोणत्या गोलंदाजाला घाबरला, मुंबई इंडियन्सच्या पराभवाचं मोठं कारण समोर

अहमदाबाद : एकिकडे हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून मिरवत होता. पण दुसरीकडे मात्र तो गुजरात टायटन्सच्या एका गोलंदाजाला घाबरला आणि हीच गोष्ट मुंबई इंडियन्सच्या पराभवाचे मोठे कारण ठरले.

मुंबई इंडियन्स हा सामना सहजपणे जिंकू शकला असता. पण त्याचवेळी हार्दिक पंड्याकडून एक मोठी चूक घडली आणि तिथेच मुंबई इंडियन्सचा पराभव झाला, असे आता समोर येत आहे. हार्दिकला गुजरातच्या एका गोलंदाजाचा सामान करायचा नव्हता. त्यामुळे त्याने रणनिती बदलली आणि तिथेच मुंबई इंडियन्सचा संघ फसल्याचे पाहायला मिळाले.

नेमकं घडलं तरी काय, जाणून घ्या....

ही गोष्ट घडली ती १६ व्या षटकात. त्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या हा हेल्मेट घालून फलंदाजीसाठी तयार झाल्याचे पाहायला मिळाले होते. १६ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर डेवाल्ड ब्रेव्हिस बाद झाला. त्यानंतर हार्दिक पंड्या हा फलंदाजीला येईल, असे वाटत होते. पण त्या चेंडूनंतर टाईम आऊट घेण्यात आला आणि समन्यात एक ब्रेक आला. पण त्यानंतर जेव्हा सामना सुरु झाला तेव्हा मात्र चाहत्यांना जोरदार धक्का बसला. कारण त्यावेळी हार्दिक पंड्या हा फलंदाजीला येईल, असे सर्वांनाच वाटले होते. पण त्यावेळी हार्दिक फलंदाजीला आला नाही तर त्याने टीम डेव्हिडला फलंदाजीला पाठवले. पण हार्दिक पंड्याने असं का केलं, याचं कारणही समोर आले आहे.

नेमकं काय ठरलं कारण...

या षटकानंतर गुजरातच्या रशिद खानचे एक षटक बाकी होते. फिरकी गोलंदाजांना भारतीय फलंदाज चांगले खेळू शकतात, कारण त्यांना लहानपणापासूनच फिरकी गोलंदाजीवर फलंदाजी करायची सवय असते. दुसरीकडे परदेशी फलंदाज फिरकी गोलंदाजीवर चांगले खेळत नाहीत. पण तरीही हार्दिक यावेळी स्वत: हेल्मेट घालून बसला असला तरी तो फलंदाजीला आला नाही. हीच त्याची मोठी चूक ठरल्याचे भारताचा माजी खेळाडू इऱफान पठाणनेही सांगितले.

इरफान पठाण काय म्हणाला, पाहा...

इरफान पठाण म्हणाला की, "भारतीय खेळाडू परदेशी खेळाडूंपेक्षा फिरकी गोलंदाजी फार चांगली खेळतात. पण रशिद खानचे एक षटक बाकी असल्यामुळे हार्दिक पंड्याच्या जागी टीम डेव्हिडला का पाठवण्यात आले." यावेळी इरफानने स्पष्ट उल्लेख केला आहे तो रशिद खानच्या एका षटकाचा. रशिद खानच्या गोलंदाजीवर आपण आऊट होऊ, ही भिती हार्दिकला वाटली असावी आणि त्यामुळेच तो स्वत: फलंदाजीला न येता त्याने टीम डेव्हिडला पुढे पाठवले.

Enter a X URL

इरफान जे बोलला ते खरं ठरल्याचे पाहायला मिळाले. कारण रशिद खानने आपल्या त्या राहीलेल्या एका षटकात चार धावा देत एक बळीही मिळवला.

हार्दिक पंड्याने यावेळी रशिद खानला खेळावे लागू नये, यासाठी टीम डेव्हिडला पुढे पाठवले. हार्दिक पंड्या यावेळी रशिद खानला घाबरला, अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगते आहे आणि सोशल मीडियामध्ये तसे पडसादही उमटले आहेत.

2024-03-24T20:25:43Z dg43tfdfdgfd