हार्दिक पंड्याच का ठरला मुंबई इंडियन्सच्या पराभवाचा व्हिलन, जाणून घ्या एकमेव खरं कारण....

हैदराबाद : मुंबई इंडियन्सला बुधवारी लाजीरवाणा परभव पत्करावा लागला, पण यासाठी कर्णधार हार्दिक पंड्याला व्हिलन ठरवलं जात आहे. पण यामागे खरं कारण आहे तरी काय, ते आता समोर आले आहे.

एक कर्णधार म्हणून हार्दिक पंड्याचे बरेच निर्णय सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात चुकले. त्यावर तर सर्व चाहत्यांनी टीका केलीच आहे. पण एक खेळाडू म्हणूनही हार्दिक पंड्याकडून या सामन्यात मोठी चूक झाली आणि त्याचाच फटका मुंबई इंडियन्सच्या संघाला बसला आणि तिथेच मुंबई इंडियन्सच्या हातून हा सामना निसटल्याचे समोर आले आहे.

हार्दिक गोलंदाजीत तर अपयशी ठरलाच. कारण मुंबईच्या गोलंदाजीची सुरुवात त्याने आणि ४ षटकांत ४६ धावा आंदण दिल्या. पण या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार हैदराबादच्या फलंदाजांनी घेतला, त्यामुळे हार्दिकल एक खेळाडू म्हणून त्याला दोषी ठरवता येणार नाही. पण हार्दिक या सामन्यात फलंदाजीला आला तो बढती घेऊन. या सामन्यात हार्दिक पाचव्या स्थानावर फलंदाजीला आला. त्यावेळी तिलक वर्मा हा तुफानी फटकेबाजी करत होता. हार्दिकने सुरुवातीला येऊन काही फटके मारले खरे. पण जेव्हा तिलक वर्मा बाद झाला त्यानंतर त्याने आपली बॅट म्यान केल्याचे पाहायला मिळाले. हार्दिक एक अनुभवी फलंदाज आहे, एकहाती सामना फिरवण्याची त्याच्यामध्ये धमक असल्याचे म्हटले जाते. पण या सामन्यात मात्र हार्दिककडून ही गोष्ट पाहायला मिळाली नाही. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हार्दिकने या सामन्यात २० चेंडूंत २४ धावा केल्या. मुंबई इंडियन्सच्या संघाकडून सर्वात कमी स्ट्राइक रेट हा हार्दिकचा असल्याचे पाहायला मिळाले. युवा खेळाडू जिथे २०० च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करत होते, तिथे हार्दिक मात्र सपशेल अपयशी ठरला आणि त्यामुळेच मुंबई इंडियन्सच्या पराभवासाठी त्याला व्हिलन ठरवले जात आहे.

हार्दिकने या सामन्यात तिलक वर्मा बाद झाल्यावर मोठे फटकेबाजी केलीच नाही. ही खेळपट्टी फलंदाजीला पोषक ठरत होती. हार्दिक बाद झाल्यावरही मुंबईच्या खेळाडूंनी धडाकेबाज फटकेबाजी कायम ठेवली होती. पण हार्दिकने मात्र विजयासाठी प्रयत्न न केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच हार्दिक पंड्याला आता मुंबईचे चाहते ट्रोल करायला लागले आहेत. कारण या सामन्यात एक कर्णधार आणि गोलंदाज म्हणून तर तो अपयशी ठरलाच. पण एक फलंदाज म्हणून मोक्याच्या क्षणी तो बाद झाला, हे पराभवाचे मोठे कारण ठरले आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-03-28T07:48:39Z dg43tfdfdgfd