हार्दिक पंड्या सोडून गेला हे गुजरातसाठी चांगलेच झाले, कारण...; माजी खेळाडू स्पष्टच बोलला

IPL 2024 Gujarat Titans Without Hardik Pandya: भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या यंदाच्या इंडियन प्रिमिअर लीग म्हणजेच आयपीएल 2024 मध्ये नव्या भूमिकेत दिसणार आहे. मागील 2 पर्वांमध्ये गुजरात टायटन्सचं नेतृत्व करणारा हार्दिक पंड्या आपल्या मूळ संघात म्हणजेच मुंबई इंडियन्सकडे परतला आहे. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माकडील कर्णधारपदही हार्दिककडे सोपवलं आहे. हार्दिकच्या एक्झीटनंतर गुजरातनेही आपल्या कर्णधारपदी शुभमन गिलला प्रमोट केलं आहे. हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबई कशी खेळणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. असं असतानाच ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूने हार्दिक पंड्याशिवाय गुजरातचा संघ अधिक चांगली कामगिरी करेल असा विश्वास व्यक्त केला आहे. हार्दिकनेच गुजरातला त्यांच्या आयपीएलच्या पहिल्याच पर्वात जेतेपद मिळवून दिलं होतं. तर दुसऱ्या पर्वात म्हणजेच 2023 मध्ये अंतिम फेरीपर्यंत पोहोचवलं होतं. 

विशेष नुकसान नाही

हार्दिक पंड्याने प्लेअर्स ट्रेडिंगमध्ये पुन्हा मुंबई इंडियन्सच्या संघात सहभागी होण्याचा निर्णय घेत सर्वांनाच धक्का दिला. मात्र हार्दिकच्या या निर्णयामुळे गुजरातला मोठा फटका बसला असून हार्दिकच्या तोडीचा खेळाडू तसेच कर्णधार मिळालेला नाही असं अनेक चाहत्यांबरोबर माजी क्रिकेटपटूंचंही म्हणणं आहे. मात्र ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू ब्रॅड हॉजने हार्दिक पंड्या गेल्याने गुजरातला काही विशेष नुकसान झालेलं नाही, अशी प्रतिक्रिया युट्यूब चॅनेलवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये नोंदवली आहे. 

तो तिथे फार योग्य नव्हता

"मला नाही वाटत की हार्दिक पंड्या जाण्याने त्यांना (गुजरातच्या संघाला) फार नुकसान झालं आहे. हो तो मधल्या फळीतील उत्तम अष्टपैलू खेळाडू होता. मात्र ते (गुजरातचा संघ) यामधून सावरेल. मात्र ते यामधून रिकव्हर होती. त्यांच्याकडे अगदी तळापर्यंत गोलंदाजी करणारे उत्तम खेळाडू आहेत. तो (हार्दिक) टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करायचा. मात्र तो तिथे फार सुटेबल होता असं मला वाटत नाही. त्यामुळे तो गेला हे गुजरातसाठी चांगलेच झाले," असं ब्रॅड हॉजने म्हटलं आहे.

नक्की वाचा >> विराटशी पंगा घेणाऱ्याकडून शोएब मलिक बोल्ड; नवऱ्याच्या विकेटनंतर पत्नीचा Video Viral

चला सुरु करुया

हार्दिकने यंदाच्या पर्वासाठी जोरदार सराव सुरु केला आहे. नुकताच त्याने मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रुममध्ये प्रवेश करुन देवाच्या फोटोला हार घालून आपल्या मोहिमेचा श्रीगणेशा केला. मुंबई इंडियन्सच्या एक्स (ट्विटर) हॅण्डलवरुन 'चला सुरु करूया' म्हणत हा व्हिडीओ शेअर केलेला. पाच वेळा मुंबईला जेतेपद मिळवून देणाऱ्या रोहित शर्माच्याऐवजी यंदा पंड्या संघाचं नेतृत्व करणार आहे.

कधीपासून सुरु होणार आयपीएल?

22 मार्चपासून आयपीएलचं पर्व सुरु होत आहे.  पहिला सामाना एम. ए. चिदम्बरम स्टेडियममध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सच्या संघादरम्यान खेळवला जाणार आहे.

 

2024-03-13T09:40:28Z dg43tfdfdgfd