हार्दिकला कॅप्टन केल्यावर मोठा वाद, पण मुंबई इंडियन्स तरीही... एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य

मुंबई : हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सने कर्णधार बनवले. त्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका झाली. आता क्रिकेट जगतातील अजातशत्रू असलेल्या एबी डिव्हिलियर्सने याबाबत मोठं वक्तव्य केल्याचे समोर आले आहे.

रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला सर्वाधिक ५ जेतेपदं मिळवून दिली होती. पण तरीही कोणतं कारण नसताना रोहित शर्माला मुंबई इंडियन्सने कर्णधार पदावरून काढून टाकलं. रोहितच्या जागी मुंबईने हार्दिककडे संघाचे कर्णधारपद दिले. त्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये जोरदारल वाद उफाळला होता. कारण रोहित शर्माच्या चाहत्यांनी मुंबई इंडियन्सला ट्रोल करायला सुरुवात केली होती. त्याचबरोबर हार्दिकलाही चाहते ट्रोल करत होते. रोहितच्या चाहत्यांनीही तर सोशल मीडियावर मुंबई इंडियन्सला अनफॉलो करायला सुरुवात केली. त्यामुळे मुंबई इंडियन्सला मोठा तोटा सहन करावा लागला होता. पण हा वाद आता शमलेला नाही. एबी डिव्हिलियर्सने आता हार्दिक आणि मुंबई इंडियन्सबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

एबी डिव्हिलियर्स म्हणाला की, " मुंबई इंडियन्सला हार्दिक पंड्याला कर्णधार करण्याचा निर्णय सोपा नव्हता. कारण जेव्हा मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला कर्णधार बनवले तेव्हा त्यांच्यावर जोरदार टीका झाली. पण मुंबई इंडियन्स या निर्णयावरून मागे हटली नाही किंवा त्याबाबत कोणतीही नकारात्मक गोष्ट त्यांच्यामध्ये पाहायला मिळाली नाही. मुंबई इंडियन्सने आपला निर्णय घेतला आणि त्यावर ते ठाम आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या निर्णयानंतर त्यांच्यावर टीका झाली असली तरी ते मात्र आनंदी आहेत आणि या निर्णयाचे समर्थन करताना ते दिसत आहेत. त्यामुळे हा निर्णय त्यांनी फार विचार करून घेतल्याचे आता समोर येत आहे. पण त्यांचा हा निर्णय योग्य आहे की अयोग्य हे या हंगामानंतर पाहायला मिळेल. त्यामुळे या हंगामात ते कशी कामगिरी करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल."

हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सने कर्णधारपद दिले आहे. त्यासाठी त्यांनी रोहित शर्माच्या चाहत्यांचा रोष पत्करला आहे. त्यामुळे आता हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचे नेतृत्व कसे करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

2024-03-15T11:32:40Z dg43tfdfdgfd