हार्दिकला ट्रोलिंगपासून वाचवण्यासाठी मुंबई इंडियन्सची चालाख खेळी; 18 हजारांची फौज बोलावली

Hardik Pandya Trolling : सलग तीन पराभवानंतर मुंबई इंडियन्सला पहिल्या विजयाची चव चाखायला मिळाली आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्स असा सामना (Mi Vs Dc Match) वानखेडेवर पहायला मिळाला. या सामन्यात रोमॅरियो शेफर्ड (Romario Shepherd) याच्या वादळी खेळीच्या जोरावर मुंबईने दिल्लीला 29 धावांनी मात दिली. दुपारचा सामना असला तरी देखील मुंबईच्या चाहत्यांनी चांगलीच गर्दी केली होती. त्यामुळे हार्दिक पांड्या (Hardik Pandya) पुन्हा ट्रोल होणार का? अशी शंका अनेकांना होती. मात्र, असं काही झाल्याचं दिसलं नाही. कारण मुंबई इंडियन्सने पांड्याची ट्रोलिंग थांबवण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली होती. 

मुंबईने दिल्लीसमोर 235 धावांचं डोंगराएवढं आव्हान ठेवलं होतं. मात्र, दिल्लीला केवळ 205 धावा करता आल्या. मुंबईकडून अखेरच्या ओव्हरमध्ये वादळी खेळी करणारा रोमॅरियो शेफर्ड (Romario Shepherd) गेमचेंजर ठरला. मुंबईच्या अखेरच्या ओव्हरमध्ये शेफर्डने चार सिक्स अन् 2 खणखणीत फोर मारले. त्यामुळे मुंबईने अखेरच्या ओव्हरमध्ये दिल्लीवर प्रेशर निर्माण केलं. दिल्लीला विजयासाठी मोठ्या पार्टरशीपची गरज होती. मात्र, चांगल्या सुरूवातीनंतर दिल्लीला फिनिशिंग करता आली नाही. या सामन्यात पांड्या आनंदी दिसत होता. त्याला कारण मुंबईचं शानदार प्रदर्शन अन् न होणारी ट्रोलिंग... पांड्या प्रेक्षकांच्या नाराजीच्या तावडीतून कसं काय सुटला? याचं उत्तर जाणून घेऊया...

मुंबई इंडियन्स फ्रँचायझी मुलांच्या शिक्षणावर भर देते. त्यामुळे मुलांना खेळण्याचा आनंद देखील लुटावा यासाठी मुंबई इंडियन्सने तब्बल 18 हजार मुलामुलींना सामना पाहण्यासाठी बोलवलं होतं. तसं पहायला गेलं तर वानखे़डेची प्रेक्षक मर्यादा ही 35 हजारांची आहे. त्यामुळे अर्ध मैदाना शाळकरी मुलांनी भरलं होतं. मैदानात सामना सुरू होण्याआधीपासून मुलांनी चांगलाच कल्ला केला. त्यामुळे इतर प्रेक्षकांनी पांड्याला ट्रोल केलं नाही. शाळकरी मुलांसाठी स्तुत्य उपक्रम हा प्रमुख उद्देश असला तरी दुसरीकडे पांड्याला होणारं ट्रोलिंग देखील थांबलं आहे. मुंबई इंडिन्सच्या मालकीन नीता अंबानी (Neeta Ambani) यांनी या उपक्रमामागील कारण सांगितलं होतं.

काही वर्षांपूर्वी मी एका लहान मुलीसोबत बसलो होतो, ती केक खात होती, पण तिने पूर्ण केक खाल्ला नाही. मी तिला विचारलं आणि ती म्हणाली, 'माझा घरी एक छोटा भाऊ आहे आणि त्याने कधीही केक चाखला नाही. त्याला केक खाता यावा यासाठी मी पूर्ण केक खालला नाही, असं ती मुलगी म्हणाली होती, असं नीता अंबानी यांनी सांगितलं. त्यावेळी सचिन तेंडूलकर देखील उपस्थित होता.

2024-04-08T10:05:48Z dg43tfdfdgfd