१० मॅच शिल्लक असताना पंतच्या चुकीमुळे दिल्ली कॅपिटल्स प्लेऑफमधून बाहेर; KKRविरुद्धच्या पराभवाने समीकरण बिघडले

विशाखापट्टणम: कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध १०६ धावांनी झालेल्या पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्स संघाला मोठा झटका बसला आहे. गुणतक्त्यात दिल्लीचा संघ ९व्या क्रमांकावर गेला आहे. दिल्लीने ४ पैकी ३ लढती गमावल्या असून त्यांच्याकडे फक्त २ गुण आहेत आणि नेट रनरेट वजा १.३४७ इतके आहे.

दिल्ली संघासाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे ती कर्णधार ऋषभ पंतचे नेतृत्व होय. कोलकाताविरुद्धच्या लढतीत पंतने केलेल्या दोन मोठ्या चुका ज्यामुळे दिल्लीचा फक्त पराभव नाही झाला तर मानहानिकारक पराभव झाला.

प्रथम फलंदाजी करताना केकेआरने २० षटकात ७ बाद २७२ धावा केल्या सुनील नरेनने ७ चौकार आणि ७ षटकारांसह ८५ धावांची खेळी केली. तर अंगकृष रघुवंशीने २७ चेंडूत ५४ धावा ठोकल्या. या शिवाय अन्य फलंदाजांनी छोट्या पण आक्रमक खेळी करून आयपीएलच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी धावसंख्या उभी करून दिली. जर अंपायर्सच्या निर्णयानंतर पंतने योग्य वेळेत निर्णय घेतला असता तर नरेन पॅव्हेलियमध्ये गेला असता. पंतकडून जेव्हा ही चूक झाली तेव्हा नरेनने ३० धावा देखील केल्या नव्हत्या.

मॅचनंतर जेव्हा पंतला विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, तेव्हा प्रचंड आवाज होता. आणि मोठ्या स्क्रीनमध्ये काही तांत्रिक अडचण होता आम्ही टायमर पाहू शकलो नाही आणि डीआरएसची वेळ संपली. ही एकमेव चूक नाही तर श्रेयस अय्यर बाबत देखील पंतने चूक केली. या स्पर्धेच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी धावसंख्या दिल्यासाठी पंतने गोलंदाजांना जबाबदार ठरवले.

केकेआरविरुद्धच्या पराभवानंतर दिल्लीला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी फक्त मॅच जिंकून चालणार नाही तर त्यासाठी नेट रनरेट चांगले ठेवावे लागेल.आयपीएलच्या प्रत्येक हंगामात हे दिसून आले आहे की, अखेरीस प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी नेट रनरेट महत्त्वाचे ठरते.

दिल्लीच्या अजून १० लढती शिल्लक आहेत. आता त्यांच्याकडे २ गुण आहेत. १६ किंवा त्यापेक्षा अधिक गुण हे प्लेऑफमधील स्थान सुरक्षित असल्याचे मानले जाते. आता यासाठी दिल्लीला १० पैकी ७ लढती जिंकाव्या लागतील. ४ किंवा ३ लढती गमावणाऱ्या संघाला १० पैकी ७ लढती जिंकणे सोपे ठरत नाही. ही गोष्ट पंतला देखील कळत असेल. स्पर्धेत दिल्ली कशी कामगिरी करते हे पाहावे लागले.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-04T12:00:17Z dg43tfdfdgfd