रोहित शर्मासाठी आली गुड न्यूज, चाहत्यांचा श्वास रोखला गेला होता पण काय घडलं जाणून घ्या...

मोहाली : मुंबई आणि पंजाब यांच्यातील सामना सुरु असताना रोहित शर्मासाठी एक आनंदाची बातमी आली. सामना सुरु असताना एक गोष्ट अशी घडली की, चाहत्यांचे श्वास रोखले गेले होते. पण त्यानंतर असं काही घडलं की, चाहत्यांचा जीव अखेर भांड्यात पडला.

रोहित शर्माचा हा २५० वा सामना होता आणि आयपीएलमध्ये त्याच्या नावावर मोठा विक्रम जमा झाला होता. त्यामुळे रोहितासाठी हा सामना खास असाच होता. सामन्यातही रोहितबाबत एक खास गोष्ट घडल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे रोहित शर्मा या सामन्यात आनंदी झाल्याचे पाहायला मिळाले आणि सूर्यकुमार यादवबरोबर त्याने आपला आनंद व्यक्त केला.

ही गोष्ट घडली ती ५ व्या षटकात. पंजाबासाठी हे षटक वेगवान गोलंदाज हर्षल पटेल टाकत होता. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर ही गोष्ट मैदानात पाहायला मिळाली. या चेंडूवर रोहित शर्मा फटका मारण्यासाठी पुढे सरसावला होता. पण यावेळी रोहित शर्माचा अंदाच थोडा चुकला. कारण हा चेंडू रोहितच्या पायावर पडला होता. रोहित तो लेग साईटला फटका मारण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याचवेळी रोहितचा अंदाच चुकला आणि चेंडू त्याच्या पॅडवर आदळला. त्यानंतर पंजाबच्या खेळाडूंनी जोरदार अपील केले. त्यावेळी पंचांनीही रोहित शर्मा बाद असल्याचा निर्णय दिला. त्यावेळी चाहत्यांचा काळजाचा ठोका चुकला होता. पण रोहित शर्माने त्यानंतर डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. पंचांच्या निर्णयाविरोधात त्याने दाद मागितली. त्यानंतर तिसऱ्या पंचांनी रिप्ले पाहिला आणि हा चेंडू स्टम्पच्या लाईनमध्ये पडलेला होता. पण हा चेंडू स्टम्पला लागत नव्हता. हे जेव्हा चाहत्यांनी पाहिले तेव्हा चाहत्यांचा जीव भांड्यात पडला. कारण स्टम्पला चेंडू लागत नसल्यामुळे रोहित नाबाद असल्याचा निर्णय तिसऱ्या पंचांनी दिला. त्यामुळे रोहित शर्मालाही यावेळी हायसे वाटले. रोहितसाठी ही गुड न्यूज होती आणि रोहितने हा आनंद सूर्यकुमार यादवबरोबर साजरा केला. रोहित शर्मा त्यावेळी १७ धावांवर होता.

रोहित शर्मासाठी हा खास क्षण होता. कारण पंचांनी त्याला बाद दिले होते. पण त्याने डीआरएस घेतला आणि त्यामुळे तो नाबाद ठरला.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-18T15:25:45Z dg43tfdfdgfd