MUMBAI INDIANS SCHEDULE: मुंबई इंडियन्स संघाचे संपूर्ण वेळापत्रक, दुसऱ्या टप्प्यात कधी, कुठे आणि कोणाविरुद्ध मॅच, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: आयपीएल २०२४चे संपूर्ण वेळापत्रक बीसीसीआयने सोमवारी जाहीर केले. यानुसार प्लेऑफच्या लढती २१ मेपासून सुरू होतील. पहिली क्वॉलिफायरची लढत २१ मे रोजी अहमदाबाद येथे होणार आहे. २२ मे रोजी एलिमिनेटरची लढत नरेंद्र मोदी स्टेडियमवर होईल. क्वॉलिफायर दोनची लढत २४ मे रोजी तर फायनल मॅच २६ मे रोजी चेन्नईच्या चेपॉक मैदानावर होणार आहे.

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सची पहिली लढत गुजरात टायटन्सविरुद्ध काल रविवारी झाली. या लढतीत मुंबईचा ६ धावांनी पराभव झाला. बीसीसीआयने जाहीर केलेल्या संपूर्ण वेळापत्रकानुसार दुसऱ्या टप्प्यात मुंबईची पहिली लढत ११ एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध मुंबईच्या वानखेडे मैदानावर होणार आहे. तर साखळी लढतीतील मुंबईची अखेरची मॅच १७ मे रोजी लखनौ सुपर जायटन्स संघाविरुद्ध घरच्या मैदानावर होईल. मुंबईने आयपीएलचे सर्वाधिक ५ वेळा विजेतेपद मिळवले असून यावर्षी मुंबईने संघाला सर्वाधिक विजेतेपद मिळवून देणाऱ्या रोहित शर्माच्या जागी हार्दिक पंड्याकडे नेतृत्व दिले आहे.

आयपीएल २०२४ मुंबई इंडियन्सचे वेळापत्रक (Mumbai Indians schedule)

२४ मार्च- गुजरात विरुद्ध मुंबई इंडियन्स- रात्री ७.३० वाजता, अहमदाबाद- मुंबईचा ६ धावांनी पराभव

२७ मार्च- हैदराबाद विरुद्ध मुंबई- रात्री ७.३० वाजता, हैदराबाद

०१ एप्रिल- मुंबई विरुद्ध राजस्थान- रात्री ७.३० वाजता, मुंबई

०७ एप्रिल- मुंबई विरुद्ध दिल्ली- दुपारी ३.३० वाजता, मुंबई.

आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील मुंबई इंडियन्सच्या लढती

११ एप्रिल- विरुद्ध बेंगळुरू, रात्री ७.३० वाजता, मुंबई

१४ एप्रिल- विरुद्ध चेन्नई, रात्री ७.३० वाजता, मुंबई

१८ एप्रिल- विरुद्ध पंजाब, रात्री ७.३० वाजता,मुल्लानपूर

२२ एप्रिल- विरुद्ध राजस्थान, रात्री ७.३० वाजता, जयपूर

२७ एप्रिल- विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वाजता, दिल्ली

३० एप्रिल- विरुद्ध लखनौ, रात्री ७.३० वाजता,लखनौ

०३ मे- विरुद्ध कोलकाता, रात्री ७.३० वाजता, मुंबई

०६ मे- विरुद्ध हैदराबाद, रात्री ७.३० वाजता, मुंबई

११ मे- विरुद्ध कोलकाता, रात्री ७.३० वाजता, कोलकाता

१७ मे - विरुद्ध लखनौ, रात्री ७.३० वाजता, मुंबई

2024-03-25T14:27:28Z dg43tfdfdgfd