ROHIT SHARMA: हिटमॅनपुढे झुकले इंग्रज...; बाय बाय रोहित म्हणणाऱ्यांनीच दिलं स्टँडिंग ओवेशन

Rohit Sharma: सध्या इंग्लंड विरूद्ध भारत यांच्यामध्ये 5 सामन्यांची टेस्ट सिरीज सुरु आहे. यामधील पाचवा आणि शेवटचा सामना धर्मशालामध्ये खेळवण्यात येतोय. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची बॅट चांगलीच तळपली. यावेळी रोहित शर्माने शानदान सेंच्युरी झळकावत ट्रोल करणाऱ्या व्यक्तींना प्रत्युत्तर दिलं आहे. पाचव्या सामन्यात रोहित शर्माने लंचला जाण्यापूर्वी आपलं शतक पूर्ण केलं. हिटमॅनच्या शतकानंतर स्टेडियममधील नजारा पाहण्यासारखा होता. 

इंग्लंड विरूद्धच्या पाचव्या सामन्यात रोहित शर्माने त्याचं 12 वं शतक पूर्ण केलं आहे. यावेळी रोहित शर्मासमोर इंग्लंडचे गोलंदाज पुरते हैराण झाले. यावेळी रोहितला शुभमन गिलची साथ मिळाली. शुभमनने यावेळी टेस्ट करियरमधील चौथं शतक पूर्ण केलं.   

रोहितला सन्मान देत झुकले इंग्रज

रोहित शर्माला बेन स्टोक्सने बाद करताच धर्मशालामध्ये उपस्थित इंग्लंडचे खेळाडू आणि समर्थकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र ज्यावेळी रोहित शर्मा आऊट झाल्यानंतर पॅव्हेलियनच्या दिशेने गेला तेव्हा त्याला स्टँडिंग ओवेशन दिलं. 

रोहित-गिलची मजबूत खेळी

रोहित शर्माने 154 बॉल्समध्ये आपलं शतक पूर्ण केलं. तर शुभमन गिलने 137 बॉल्समध्ये शतक ठोकलं. विशेष म्हणजे या टेस्ट सिरीजमधील दोघांचंही हे दुसरं शतक होतं. रोहित शर्मा 103 रन्सवर बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. तर शुभमन गिल 110 रन्स जेम्स एंडरसनच्या गोलंदाजीवर पॅव्हेलिअनमध्ये परतला. गिलने आपल्या शतकी खेळीत 12 चौकार आणि 5 सिक्स ठोकले. रोहित शर्माचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील हे 48 वं शतकं होतं.

ख्रिस गेलचा रेकॉर्डही मोडला

इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्ट सामन्यात रोहित शर्माने शतक झळकावलं असून एक ओपनर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं ठोकण्याच्या बाबतीत वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलला मागे टाकलंय. ख्रिस गेलने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ओपनर म्हणून 42 शतकं झळकावलीयेत. तर आता रोहित शर्माच्या नावावर 43 शतके झाली आहेत. या यादीत रोहितच्या पुढे फक्त दोन फलंदाज आहेत. यामध्ये डेव्हिड वॉर्नर आणि सचिन तेंडुलकरच नाव आहे.

2024-03-08T14:12:33Z dg43tfdfdgfd