मुंबईने रणजी जिंकल्यावर अजिंक्य रहाणे असं का म्हणाला, सर्वात कमी धावा केल्या...

मुंबई : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईने ४२ व्या रणजी करंडक स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी घातली. हा मुंबईबरोबरच अजिंक्यसाठीही आनंदाचा क्षण होते. पण त्यानंतर अजिंक्यच्या वक्तव्यावे सर्वांनाच धक्का बसला आहे.

मुंबई आणि विदर्भ यांच्यात रणजी स्पर्धेचा अंतिम फेरीचा सामना झाला. हा सामना चांगला रंगतदार झाला. कारण पाचव्या दिवशी कोणता संघ जिंकेल, हे कोणीही सांगू शकत नव्हते. पण अजिंक्यच्या नेतृत्वाखालील मुंबईचा संघ हा दडपणाखाली आला नाही. मुंबईने विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडकरला बाद केले आणि विजयाच्या दिशेने कूच केली. मुंबईने या सामन्यात विदर्भापुढे जिंकायला ५३८ धावांचे आव्हान ठेवले, तरीही अजिंक्य कमी धावांबाबत म्हणाला आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

विजयानंतर अजिंक्य रहाणे नेमकं काय म्हणाला, पाहा....

अजिंक्य म्हणाला की, " रणजी स्पर्धा जिंकणं, ही खास गोष्ट आहे. या गोष्टीचा मला सर्वात जास्त आनंद आहे. कारण गेल्या वर्षी आम्ही बाद फेरीतही पोहोचू शकलो नव्हतो. फक्त एका धावेने आमची संधी हुकली होती. पण ही कसर यावेळी आम्ही भरून काढली. एक खेळाडू म्हणून तुमच्या कारकिर्दीत बरेच चढ उतार येत असतात. या संपूर्ण रणजी हंगामात मुंबईकडून सर्वात कमी धावा मी केल्या आहेत, पण तरीही रणजीची ट्रॉफी हातामध्ये आहे. एका खेळाडूपेक्षा तुम्ही संघामधील वातावरण एक कर्णधाक म्हणून कसे ठेवता, हे सर्वात महत्वाचे आहे. संघांमध्ये आम्ही क चांगले फिटनेस कल्चर निर्माण केले आणि त्यासाठी मुंबई क्रिकेट संघटनेने आम्हाला सर्वतोपरी मदत केली. त्यामुळेच आम्हाला हा विजय साकारता आला."

स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू तनुश कोटीयन काय म्हणाला की, " गेल्या वर्षी माझा आत्मविश्वास थोडा वाढला होता. पण यावर्षी मी सर्वोत्तम कामगिरी करू शकलो. यामध्ये कर्णधार अजिंक्य रहाणेचा महत्वाचा वाटा आहे. माझ्या वडिलांनीही यामध्ये मेहनत घेतली. त्यामुळेच मला ही चागंली कामगिरी करता आली."

मुंबईच्या संघाचे हे ४२ वे रणजी विजेतेपद आहे. यावर्षी मुंबईने विविध वयोगटांमध्ये मिळून एकूण ७ जेतेपदं मिळवली आहेत.

2024-03-14T14:15:23Z dg43tfdfdgfd