यावर्षी आयपीएलचे सामने नेमके किती वाजता सुरु होणार, जाणून घ्या योग्य वेळ...

मुंबई : आयपीएलचा पहिला सामना आता काही तासांवर येऊन ठेपला आहे. शनिवार आणि रविवारी आयपीएलचे दोन सामने असतात. पण हे सामने नेमके किती वाजता सुरु होणार आहेत, याची माहिती आता समोर आली आहे.

दिवसामध्ये एकच सामना असेल तर तो किती वाजता सुरु होणार...

जर एकच सामना असेल तर त्यासाठी खेळाडू मैदानात साधरणपणे संध्याकाळी ६.०० च्या सुमारास दाखल होतात. त्यावेळी पंच मैदानाची पाहणी करण्यासाठी उतरतात. जर सामना नियोजित वेळेत सुरु करण्यासाठी कोणतीही बाधा येत असेल, तर त्याबाबतची माहिती ते दोन्ही कर्णधारांना देतात. पाऊस पडला असेल तर सामना किती वाजता सुरु करायचा हा निर्णय पंच घेतात. जर सामना सुरु करण्यासाठी कोणतीही बाधा नसेल तर संध्याकाळी ७.०० वाजता सामन्याचा टॉस उडवला जातो. टॉस झाल्यावर दोन्ही कर्णधार आपल्या संघाबाबत माहिती देतात. त्यानंतर दोन्ही संघातील खेळाडू काही वेळ सराव करतात. टॉसनंतर अर्ध्या तासाने म्हणजेच रात्री ७.३० वाजता सामना सुरु केला जातो.

एका दिवसात दोन सामने असतील तर ते किती वाजता सुरु होतात...

शनिवार, रविवार किंवा राष्ट्रीय सुट्ट्यांच्या दिवशी दोन सामने खेळवले जातात. यापैकी पहिला सामना दुपारी आणि दुसरा सामना रात्री खेळवला जातो. पहिल्या सामन्यासाठीचा टॉस दुपारी ३.०० वाजता होतो. त्यानंतर अर्ध्या तासाने म्हणजेच दुपारी ३.३० वाजता सामना सुरु केला जातो. या दिवशीचा दुसरा सामना हा नियोजित वेळेनुसार रात्री ७.३० वाजताच सुरु केला जातो.

आयपीएलच्या सामन्यांमध्येच फक्त टाइम आऊट हा प्रकार असतो. त्यामुळे सामना कधी सुरु केला जातो, हे महत्वाचे ठरते. कारण प्रत्येक सामन्यात चार टाइम आऊट असतात. त्यामुळे प्रत्येक सामन्यात १० मिनिटे ही टाइम आऊटमध्ये जात असतात. त्याचबरोबर आयपीएलमध्ये कधीही दोन षटकांमध्ये राखीव खेळाडू हे पाणी किंवा अन्य काही गोष्टी घेऊन मैदानात येत असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे आयपीएलचे सामने नियोजित वेळेमध्ये फार कमी वेळा पूर्ण झाल्याचे पाहायला मिळते. पण यंदाच्या आयपीएलमध्ये स्मार्ट रिप्लाय सिस्टीम वापरण्यात येणार आहे आणि त्याची उत्सुकता सर्वांनाच असणार आहे.

यावर्षी आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक अजून जाहीर करण्यात आलेले नाही. कारण भारतामध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत. त्यानुसार आता आयपीएलचे वेळापत्रक बनवण्यात येणार आहेत. पण आयपीएलचे सामने नेमके कधी सुरु होणार, हे आता स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक कधी जाहीर करण्यात येते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

2024-03-21T10:17:45Z dg43tfdfdgfd