रोहित शर्माने माझी झोप उडवली होती, गौतम गंभीर असं का म्हणाला पाहा खास व्हिडिओ...

मुंबई : रोहित शर्माबाबत भारताचा माजी सलामीवीर आणि केकेआरचा मार्गरदर्शक गौतम गंभीरने एक मोठे वक्तव्य केले आहे. रोहित शर्माने तर माझी झोप उडवली होती, असे गंभीरने म्हटले आहे. मुंबई इंडियन्स आणि केकेआर यांच्यातील सामन्यापूर्वी गंभीरची एक खास मुलाखत घेण्यात आली आणि यामध्ये गंभीरने रोहितबाबाबत बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. गंभीरचा हा व्हिडिओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाला आहे.

गंभीरनंतर रोहित शर्मा हा भारतीय संघात आला. पण रोहितला संधी देण्यासाठी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने गंभीरलाही बाकावर बसवले होते. पण रोहितने या संधीचे सोने केले. रोहितने त्यानंतर एक सलामीवीर म्हणून आपली जगभरात ओळख निर्माण केली. आयपीएलमध्ये मुंबई आणि केकेआरचा सामना असताना रोहित आणि गंभीर हे दोघेही आमने सामने आले होते. हे दोघे संघाचे कर्णधार आणि सलामीवीरही होती. त्यावेळी रोहित शर्माने माझी झोप का उडवली होती, हे गंभीरने यावेळी सांगितले आहे.

गंभीरने सांगितले की, " आयपीएल खेळताना मी कोणत्याही फलंदाजासाठी कधीच रणनिती आखली नाही. ख्रिस गेल किंवा एबी डिव्हिलियर्स यांचा दरारा मला कधीच वाटायचा नाही, पण या गोष्टीचा अपवाद ठरला होता तो रोहित शर्मा. कारण रोहित शर्मासाठी मी चक्क तीन तीन प्लॅन्स आखायचो. पण त्यानंतर वाटायचं की, पहिला जो प्लॅन आहे त्यावर रोहित बाद होणार नाही. त्यानंर दुसऱ्या आणि तिसऱ्या प्लॅन्सचा मी विचार करायचो. रोहित हा असा एक खेळाडू आहे की, ज्याचामुळे मला रात्री झोप लागायची नाही. रोहितने माझी झोपच उडवली होती. मी विचार करायचो की, सुनील नरिनला कोणते षटक देऊ किंवा नरिनची चार षटकं जर लवकर संपली तर काय करायचं. कारण रोहित शर्मा हा कधीही काहीही करू शकतो, हे मला माहिती होते. माझा तसा विश्वास होता. कारण रोहित शर्मा एका षटकात तीस धावाही काढू शकतो, हा मला विश्वास होता. कारण रोहितची फलंदाजी ही त्या दर्जाची होती. त्यामुळेच रोहितच्या फलंदाजीचा चांगलाच दरारा होता आणि त्यामुळे त्याने माझी झोप उडवली होती."

View this post on Instagram

A post shared by Star Sports India (@starsportsindia)

]]>

रोहित शर्मा हा एक दर्जेदार सलामीवीर आहे आणि हे पुन्हा एकदा ऐकायला मिळाले आहे. गंभीर जो केकेआरचा कर्णधार होता आणि आता मार्गदर्शक आहे, त्याने रोहितबद्दल जे म्हटले आहे, ते नक्कीच ऐकण्यासारखे आहे. एक खेळाडू म्हणून रोहित शर्माचा दरारा नेमका केवढा आहे, हे गंभीरच्या या बोलण्यावरून पाहाययला मिळत आहे.

आता रोहित केकेआरच्या सामन्यात कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. कारण मुंबई इंडियन्ससाठी हा करो या मरो, असाच सामना असेल.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-03T12:25:27Z dg43tfdfdgfd