रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या संघाने दिला खास पुरस्कार, व्हिडिओमध्ये नेमकं घडलं तरी काय

मुंबई : रोहित शर्माला आता एक खास पुरस्कार मिळाला आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाने ड्रेसिंग रुममध्ये एक खास कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी रोहित शर्माला एक खास पुरस्कार मुंबई इंडियन्सच्या संघाने दिला. रोहितलाच हा खास पुरस्कार का दिला जात आहे, हेदेखील मुंबई इंडियन्सच्या संघाने यावेळी स्पष्ट केले आहे. मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रुममधला व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

हार्दिक पंड्या हा जरी मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार असला तरी रोहित शर्माचे संघातील वजन कमी झालेले नाही. मुंबई इंडियन्सच्या संघालाही या गोष्टीची चांगली जाण आहे. मुंबईने या हंगामाती पहिला विजय साकारला, त्यानंतर खेळाडूंनी जोरदार सेलिब्रेशन केले. पण त्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये त्यानंतर एक खास कार्यक्रम मुंबई इंडियन्सच्या संघाने आयोजित केला होता. या कार्यक्रमाची सूत्रं मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर यांच्या हातात होती. त्यानंतर मार्क यांनी रोहित शर्माचे कौतुक केले. त्यानंतर किरॉन पोलार्डने रोहित शर्माला खास पुरस्कारही दिला.

View this post on Instagram

A post shared by Mumbai Indians (@mumbaiindians)

]]>

रोहित शर्माने यावेळी मुंबई इंडियन्सच्या संघाला तुफानी सुरुवात करून दिली. त्यामुळेच मुंबई इंडियन्सच्या संघाला २०० धावांचा पल्लाही ओलांडता आला. यावेळी सामनावीर हा पुरस्कार रोमारिओ शेफर्डला देण्यात आला. पण रोहित शर्माची खेळी मुंबई इंडियन्सचा संघ विसरू शकला नाही. त्यामुळे संघाला दमदार सुरुवात करून दिल्याबद्दल रोहित शर्माला खास पुरस्कार देण्यात आला. मुंबई इंडियन्सचा फलंदाजी प्रशिक्षक पोलार्डने यावेळी रोहितला हा पुरस्कार दिला. हा पुरस्कार म्हणजे मुंबई इंडियन्सचा एक बॅच असतो, तो खेळाडूच्या टी शर्टवर लावला जातो. हा बॅच मिळवणे ही खेळाडूसाठी अभिमानाची गोष्ट असते. मुंबईच्या पहिल्या विजयात हा खास पुरस्कार रोहित शर्माला मिळाला आहे. त्यामुळे रोहितची जादू अजूनही मुंबई इंडियन्सच्या संघात कायम आहे, हे समोर येत आहे.

रोहित शर्माचे अर्धशतक हे गेल्या सामन्यात फक्त एकाच धावेने हुकले. रोहित शर्मा या सामन्यात ४९ धावांवर असताना बाद झाला, पण त्याने संघाला धडाकेबाज सुरुवात करून देण्याचे काम चोख बजावले.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-08T08:19:17Z dg43tfdfdgfd