MI VS DC PREDICTED PLAYING: दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मुंबई इंडियन्स संघात कोणाला संधी? अशी असेल प्लेइंग इलेव्हन

मुंबई: आयपीएल २०२४ मध्ये उद्या ७ एप्रिल हा सुपर संडे असणार आहे आणि यात मुंबई इंडियन्सची लढत दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध होणार आहे. एका बाजूला मुंबईचा संघ ज्यांनी हंगामातील पहिल्या ३ लढती गमावल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला दिल्ली कॅपिटल्सचा संघ ज्यांनी ४ पैकी फक्त १ लढत जिंकली आहे. एक संघ सर्वात शेवटच्या क्रमांकावर तर दुसऱ्या बाजूला दिल्लीचा संघ जो नवव्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघ आयपीएलच्या १७व्या हंगामात संघाची गाडी रुळावर आणण्यासाठी आमनेसामने असतील.

सूर्याच्या जागी कोणाला घेणार?

या सामन्यात मुंबई इंडियन्सला आनंदाची बातमी मिळू शकते. सूर्यकुमार यादव संघात परतला असून तो दिल्लीविरुद्धच्या लढतीसह आयपीएल २०२४ची सुरुवात करू शकतो. आगामी टी-२० वर्ल्डकपच्या दृष्टीने त्याच्या कामगिरीकडे सर्वांची नजर असेल. सूर्या दुखापतीमुळे गेल्या ३ महिन्यांपासून मैदानाबाहेर होता. आता तो संघात आल्यास नमन धीरला बाहेर बसावे लागू शकते. धीर गेल्या ३ लढतीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतोय. त्याच बरोबर डेवाल्ड ब्रेविसच्या जागी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून नेहाल वढेराला संधी दिली जाऊ शकते. गोलंदाजीत नुवान थुषाराला अंतिम ११ मध्ये स्थान मिळू शकते. मफाकाला या लढतीत बाहेर बसवले जाऊ शकते.

दोन्ही संघातील हेड टू हेडएकूण लढती- ३३

मुंबई- १८

दिल्ली- १५

दिल्लीसाठी धक्का

कुलदीप यादवच्या दुखापतीमुळे दिल्लीची गोलंदाजी कमकुवत झाली आहे.दिल्लीच्या गोलंदाजांनी गेल्या लढतीत खराब कामगिरी केली होती. केकेआरच्या फलंदाजांनी त्यांची बेदम धुलाई करत स्पर्धेच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या उभी केली होती. मुंबई विरुद्ध सुमित कुमारच्या जागी मुकेश कुमारला संधी दिली जाऊ शकते. रसिख सलामच्या जागी फिरकीपटू प्रवीण दुबेला अंतिम ११ मध्ये स्थान मिळू शकते. फलंदाजीत कर्णधार ऋषभ पंतने गेल्या दोन लढतीत अर्धशतक केले असले तरी त्याला अन्य फलंदाजांची साथ मिळाली नाही.

संभाव्य प्लेइंग इलेव्हनमुंबई इंडियन्स : इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, जेराल्ड कोएट्झी, पीयूष चावला, आकाश मधवाल, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा

इम्पॅक्ट खेळाडू : देवल्ड ब्रेविस, नमन धीर, रोमारिओ शेफर्ड, नेहाल वढेरा, शम्स मुलानी

दिल्ली कॅपिटल्स: पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिशेल मार्श, ऋषभ पंत (विकेटकीपर आणि कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, मुकेश कुमार, प्रवीण दुबे, एनरिच नॉर्त्जे, इशांत शर्मा, खलील अहमद

इम्पॅक्ट खेळाडू : अभिषेक पोरेल, कुमार कुशाग्रा, रसिक दार सलाम, ललित यादव, जेक फ्रेजर-मॅकगर्क.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-06T17:30:41Z dg43tfdfdgfd