ROHIT SHARMA: तुम्हाला ओरडून-ओरडून माझा घसा...; स्टंप माईकमध्ये कैद झाला रोहितचा भलताच ऑडिओ

Rohit Sharma: भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सध्या 5 सामन्यांची टेस्ट सिरीज सुरु आहे. या सिरीजमध्ये 2 सामने झाले असून दोन्ही टीमच्या नावे प्रत्येकी 1-1 विजयाची नोंद आहे. दुसऱ्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाने 106 रन्सने इंग्लंडचा पराभव केला आहे. दरम्यान या सामन्यात कर्णधार रोहित शर्माकडून अनेक घटना घडल्या. मात्र यावेळी एक घटना अशी घडली, ज्यामुळे चाहते त्यांचं हसू रोखू शकले नाहीत. 

स्टंप माईकमध्ये रोहितचा वॉईस कॅप्चर

या सामन्यादरम्यान रोहित शर्माचा एक वॉईस स्टंपमध्ये कैद झाला आहे. यावेळी रोहित शर्मा लाईव्ह सामन्यात असं म्हणतोय की, "तुम्हाला ओरडून ओरडून माझ्या घश्याची वाट लागली आहे. ( गले का वाट लग गया है चिल्ला चिल्ला के )" रोहित शर्माचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यावेळी चाहत्यांनीही या व्हिडीओवर विविध कमेंट्स केल्या आहेत. 

इंग्लंडच्या फलंदाजांना रन करण्यापासून आणि विकेट घेण्यापासून रोखण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा फिल्डींग करत होता. या काळात रोहितने अनेक शानदार कॅच देखील पकडले. घेतले. तिसऱ्या टेस्ट सामन्यात भारताने इंग्लंडचा 106 रन्सने पराभव केला आहे. 

यापूर्वीही रोहितचा व्हिडीओ झाला होता व्हायरल

दुसऱ्या टेस्ट सामन्यामध्ये रोहित शर्माचा अजून एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा म्हणाला की, " भेंंxx, कोई भी गार्डन में घुमेगा तो x xx xx में उसका..." रोहित शर्माचे हे शिवराळ बोलणं टीम इंडियाच्याच खेळाडूंसाठी होतं हे नक्की. या सामन्यात काही खेळाडू गार्डनमध्ये फिरायला येतात तसं कदाचित चालत असतील आणि त्यांना उद्देशून रोहित शर्मा हे बोलला असल्याचा अंदाज या वाक्यावरून लावण्यात येतोय. 

रोहित शर्माचा भन्नाट कॅच

या सामन्यात रोहित शर्माच्या कॅचने चाहत्यांचं लक्ष पुन्हा एकदा वेधलं होतं. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात 29 व्या ओव्हरमध्ये कर्णधार रोहित शर्माने बॉल स्पिनर गोलंदाज आर अश्विनच्या हातात सोपावला. अश्विनच्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर इंग्लंडचा फलंदाज ओली पोपने फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण बॉल त्याच्या बॅटची कडा घेऊन स्लीपमध्ये गेला. स्लीपमध्ये उभा असलेल्या रोहित शर्माने डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच हा अवघड कॅच टिपला. अवघ्या 0.45 सेकंदात रोहितने हा कॅच झेलला.

2024-02-06T11:51:39Z dg43tfdfdgfd