रोहित शर्माकडून हार्दिक पंड्याने काय शिकायला हवं, झहीर खानने मॅचपूर्वी स्पष्टच सांगितलं...

मुंबई : हार्दिक पंड्याकडे मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद आहे. पण तरीही त्याला रोहित शर्मासारखे नेतृत्व करता येत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हार्दिकने रोहितकडून नेमकं काय शिकायला हवं, हे मुंबई इंडियन्सच्या क्रिकेट ऑपरेशन्सचे संचालक आणि जिओ सिनामेचे आयपीएल एक्सपर्ट (Zaheer Khan, IPL Expert, JioCinema)झहीर खानने खास मुलाखतीमध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे. मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्या सामन्यापूर्वी झहीर खानची एक खास मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी झहीर खानने मुंबई इंडियन्सच्या नेतृत्वाब्दल महत्वाची गोष्ट सांगितली आहे.

रोहित शर्माने मुंबई इंडियन्ससाठी पाच जेतेपदं जिंकली आहेत. पण तरीही मुंबई इंडियन्सच्या संघाने त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेतले आणि हार्दिक पंड्याला नेतृत्व करायला दिले. पण त्यानंतर चाहत्यांनी हार्दिक पंड्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर हार्दिक पंड्याकडून एक खेळाडू म्हणूनही चांगली कामगिरी झालेली नाही. एक फलंदाज आणि गोलंदाज म्हणूनही तो अपयशी ठरला आहे. कर्णधाक म्हणून बोलायचे झाले तर हार्दिकला आतापर्यंतच्या सहा सामन्यांमध्ये चार पराभव पत्करावे लागले आहेत, तर फक्त दोनच विजय मिळवता आले आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ हा गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. त्यामुळे हार्दिकने रोहितकडून काही गोष्टी शिकण्याची गरज आहे, असे म्हटले जात आहे. झहीर खानने याबाबत आपले मत व्यक्त केले आहे.

झहीर म्हणाला की, " रोहित शर्मा बरेच वर्षे मुंबई इंडियन्सचा कर्णधार होता. रोहितने एवढी वर्षे मुंबई इंडियन्ससाठी चांगलं काम केलं होतं. रोहितने पाच जेतेपदं मुंबई इंडियन्ससाठी जिंकली होती. रोहित शर्माचा खेळाडूंकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. रोहित शर्मा हा कर्णधार असताना संघातील प्रत्येक खेळाडूशी संवाद साधायचा, त्याच्याबरोबर वेळ व्यतित करायचा, त्याला प्रोत्साहन द्यायचा. एक कर्णधार म्हणून ही गोष्ट सर्वात महत्वाची आहे. माझ्यामते हार्दिकनेही हीच गोष्ट रोहितकडून शिकायला हवी आणि एक कर्णधार म्हणून त्याच्यासाठी ही गोष्ट महत्वाची असेल. जेव्हा संघ विजय मिळवेल, तेव्हा गोष्ट नक्कीच वेगळी असेल. पण एक गोष्ट नक्कीच सांगतो की, संघामधून हार्दिक पंड्याला कायम पाठिंबाच मिळत आहे आणि यापुढेही मिळत राहील."

रोहित शर्माने कर्णधार असताना ज्या महत्वाच्या गोष्टी केल्या. त्या गोष्टी जर हार्दिकने केल्या तर नक्कीच संघात मोठा बदल होऊ शकतो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हार्दिकने सर्व खेळाडूंबरोबर संवाद साधायला हवा. त्यामुळे संघात चांगले वातावरण निर्माण होऊ शकते.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-18T13:25:18Z dg43tfdfdgfd