HARDIK PANDYA: जलवा है हमारा... हार्दिक पंड्याची विस्फोटक खेळी, षटकारांचा वर्षाव करत जोरदार कमबॅक

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२४च्या १७व्या हंगामात हार्दिक पंड्याला जबरदस्त ट्रॉलिंगला सामोरे जावे लागले, मुंबई इंडियन्सचा कर्णधारपद हार्दिकला दिल्यापासून त्याला बऱ्याच ट्रॉलिंगला सामोरे जावे लागले, तर हार्दिकचे मैदानातील वागणुकीमुळेसुद्धा त्याच्यावर बरीच टीका करण्यात आली.

मुंबई इंडियन्सचे कर्णधार पद सांभाळताना हार्दिकने खूपच निराशाजनक कामगिरी केली तर मुंबई हा प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला. हार्दिकने स्वतः सुद्धा कर्णधारला साजेशी खेळी या हंगामात खेळली नाही त्यामुळे त्याच्यावर बरीच टीका झाली तर आता टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघात त्याला स्थान मिळाले. तर सगळ्यांचेच लक्ष हार्दिक वर्ल्डकपमध्ये कशी कामगिरी करतो यावर असताना वर्ल्डकपपूर्वी बांगलादेशविरुद्ध सराव सामन्यात त्याने जबरदस्त कामगिरी केली.

हार्दिकची जबरदस्त कामगिरी

अष्टपैलू हार्दिकने आपल्या खेळीत २३ चेंडूंचा सामना केला ज्यामध्ये त्याने दोन चौकार आणि चार षटकारही मारले. आपल्या दमदार फलंदाजीत हार्दिकने हॅट्ट्रिक षटकार ठोकला. बांगलादेशकडून १७वे षटक टाकण्यासाठी आलेल्या तनवीर हसनविरुद्ध हार्दिकने पहिल्या तीन चेंडूंवर सलग तीन षटकार मारून खळबळ उडवून दिली. हार्दिकची ही जबरदस्त फलंदाजी पाहून टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड खूप खुश दिसत होते.

अमेरिकेत खेळल्या जाणाऱ्या टी-२० वर्ल्डकपपूर्वी हार्दिक पांड्याची कामगिरी काही विशेष चांगली नव्हती तर हार्दिकचे पुनरागमन ही रोहित शर्मासाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. हार्दिक हा टीम इंडियाचा मुख्य अष्टपैलू खेळाडू आहे. स्फोटक फलंदाजीसोबतच तो संघातील तिसऱ्या वेगवान गोलंदाजाच्या भूमिकेतही दिसणार आहे. अशा परिस्थितीत हार्दिकची चांगली कामगिरी खूप महत्त्वाची ठरणार आहे.

भारताचा दणदणीत विजय

बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. संघाची सुरुवात खराब झाली. संजू सॅमसन केवळ एक धावा करून बाद झाला. मात्र, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ऋषभ पंतने दमदार अर्धशतक झळकावले. पंतने ३२ चेंडूत ५३ धावांची खेळी खेळली. त्याच्या दमदार फलंदाजीमुळे भारतीय संघाने निर्धारित २० षटकांच्या सामन्यात पाच गडी गमावून १८२ धावा केल्या.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-02T09:15:15Z dg43tfdfdgfd