इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कोणाला मिळाली संधी

नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यासाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आहे. बीसीसीआयेन काही क्षणापूर्वीच ही माहिती दिली आहे. पाचव्या सामन्यासाठी भारतीय संघात कोणाला संधी मिळणार, हे आता स्पष्ट झाले आहे.

भारतीय संघाने या मालिकेतील सलग तीन सामने जिंकले आहेत. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर भारताने या मालिकेत दमदार पुनरागमन केले. त्यामुळे विशाखापट्टणम, राजकोट आणि रांची या तिन्ही कसोटी सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला. त्यामुळे भारताला या मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी मिळवता आली. आता पाचव्या सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे आणि त्यांनी आता आपला संघ जाहीर केला आहे.

पाचव्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह आणि लोकेश राहुल यांचे भारतीय संघात पुनरागमन होणार होते. त्यामुळे चाहत्यांना उत्सुकता होती की, हे दोघे या सामन्यात खेळणार की नाही. याबाबतची माहिती आता बीसीसीआयने दिली आहे. या पाचव्या कसोटी सामन्यासाठी निवडण्यात आलेल्या संघात जसप्रीत बुमराहचे संघात पुनरागमन झाले आहे. त्यामुळे आता बुमराह हा पाचव्या कसोटीत खेळणार असल्याचे निश्चित झाले आहे. पण राहुल मात्र या कसोटी सामन्यात खेळणार नसल्याचे यावेळी समोर आले आहे. कारण राहुल हा दुखापतीवर उपचार घेण्यासाठी आता लंडनला गेला आहे. उपचारानंतर राहुलला काही काळ विश्रांती घ्यावी लागणार आहे. त्यामुळे राहुल हा पाचव्या कसोटी सामन्यात खेळणार नसल्याचे आत स्पष्ट झाले आहे.

पाचव्या कसोटीसाठी भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उप कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.

भारताने जर पाचवा कसोटी सामना जिंकला तर ही मालिका त्यांना ४-१ अशी खिशात टाकता येईल. दुसरीकडे इंग्लंडला हा सामना जिंकला तर त्यांचा हा मालिकेतील दुसरा विजय ठरेल. पण त्यांना मालिकेत भारताशी बरोबरी मात्र करता येणार नाही.

2024-02-29T09:37:17Z dg43tfdfdgfd