बीसीसीआयने वाढवलं विराट कोहलीचं टेंशन, करारात स्थान मिळनूही डोकेदुखी वाढली

नवी दिल्ली : आपण या वर्षी कोणत्या खेळाडूंशी करार करणार, हे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. बीसीसीआयने आपण कोणाशी करार करणार, ते स्पष्ट केले आहे. विराट कोहलीला करारात स्थान देण्यात आले आहे. पण दुसरीकडे आता बीसीसीआयने विराट कोहलीचं टेंशन वाढवल्याचे समोर आले आहे.

बीसीसीआयने खेळाडूंशी केलेला करार सध्याच्या घडीला चांगलाच गाजत आहे. कारण बीसीसीआयने आपल्या करारामधून ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्याचबरोबर अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि शिखर धवन यांनाही करारामधून वगळले आहे. त्यामुळे यावेळी बीसीसीसआयने काही खेळाडूंना जोरदार धक्के दिले आहेत. दुसरीकडे विराटने मात्र या करारात आपले स्थान कायम राखले आहे. पण बीसीसीआयचा करार मिळूनही आता विराट कोहलीची डोकेदुखी वाढू शकते, असे आता समोर आले आहे.

कोहली सध्याच्या घडीला सुट्टीवर आहे. आपल्या बाळाच्या जन्मासाठी विराटने बीसीसीआयकडे विश्रांती देण्याची विनंती केली होती. बीसीसीआयने त्याची विनंती मान्य केली. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच विराट कोहीलच्या घरी पाळणा हलला. त्यामुळे आता चौथा कसोटी सामनाही तो खेळणार नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता तो थेट आयपीएलमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. पण त्यानंतर टी-२० वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. पण बीसीसीआयने आता एक नवीन नियम काढला आहे. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी खेळाडूंना स्थानिक क्रिकेट खेळावे लागणार आहे. ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांच्यासाठी बीसीसीआयने हाच नियम लावला व त्यांना करारामधून बाहेर काढले. दुसरीकडे आता हार्दिक पंड्यानेही आपण स्थानिक क्रिकेट खेळणार असल्याची हमी दिली आहे. त्यामुळे विराट कोहलीला संघात स्थान मिळवण्यासाठी आता स्थानिक क्रिकेट खेळावे लागणार आहे. त्यामुळे कोहलीची डोकेदुखी वाढलेली असेल.

कोहली यापूर्वी जेव्हा संघात कमबॅक करायचा तेव्हा तो थेट टीममध्ये यायचा. पण आता त्याला संघात स्थान पुन्हा मिळवायचे असेल तर त्याला आता स्थानिक क्रिकेट स्पर्धा खेळावी लागणार आहे. त्यामुळे कोहलीसाठी ही एक मोठी डोकेदुखी ठरू शकते. त्यामुळे आता कोहली स्थानिक स्पर्धा खेळणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. दुसरीकडे बीसीसीआय सर्वांनाच समान न्याय करणार का, हे पाहणेही भविष्यात उत्सुकतेचे ठरणार आहे.

विराट आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांच्या आयुष्यात दुसरं बाळ आलं. त्यांना पूत्ररत्न झालं. या बाळाचं नाव त्यांनी अकाय असे ठेवले आहे. सध्याच्या घडीला कोहली आपल्या कुटुंबियांसोबत आहे.

2024-03-01T08:24:43Z dg43tfdfdgfd